Breaking News

*पारशिवनी तालुकात रविवारी ०-ते ०५वर्ष चे ११,५२४ बालकाना१६५ बुथ व्दारे दिले जाणार , पल्स पोलियो डोज*

*पारशिवनी तालुकात रविवारी ०-ते ०५वर्ष चे ११,५२४ बालकाना१६५ बुथ व्दारे दिले जाणार , पल्स पोलियो डोज*

 

पाराशिवनी तालुका प्रतिनिधी- कमलसिंह यादव

पारशिवनी-पाराशिवनी तालुका व शहरी भागात३१जनवरी २विवार ला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व ११,५२४ बालकांच्या पालकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या बालकांना पोलिओचा डोस न चुकता दिनांक ३१/०१/२०२१ रोज रविवार ला
आपल्या जवळच्या बुथवर
अंगणवाडी, शाळा बस स्टँड ,रेल्वे स्टेशन ,टोलनाके, सर्व रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजून घ्या.

१) बाळ नुकतेच जन्मलेले असेल तरीही
२)या पूर्वी डोस दिला असेल तरीही
३) बाळ आजारी असेल तरीही( वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावा)

दोन थेंब पोलिओ चेआयुष्य लाभेल मोलाचे–
—चला तर मग,
रविवार दिनांक ३१/०१/२०२१ ला
वेळ:सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.मोहिमेंतर्गत ३१ जानेवारी २0२१ रोजी पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये 0 ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ३१ जानेवारी रोजी पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. तरी ही लसीकरण मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन ।तालुका वैद्याकिय आधिकारी डॉ प्रशांत वाघ,व ग्रामिणा रूग्णालय चे वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन धुर्वे ,सह ता लुका चे प्रा आ केन्द्र ,उपकेन्द चे वैद्याकिय अधिकारी यांनी केले आहे.
कार्यालयाच्या सभागृहात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम तालुनका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत वाद्य, माता व बाल संगोपन अधिकारी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुकायत सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना करीत ता आ अधि., तहसिल्दार ,खs विकास अच्छीकारी ,माता बाल संगोपण आधिकारी, बाल विकास प्रकल्प आधिकारी म्हणाले, लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात यावी.
यासाठी एकुण बुथ १५२ मोबाईल पथक ०८ , ट्रान्सीट१४ टीम आदी सज्ज ठेवाव्यात. तालुकात ग्रामीण व शहरी भागात १२ हजार ५२४बालके असून कन्हान शहरी भागात ५ हजार ४९९ बालके आहेत. अशाप्रकारे एकूण १२ हजार ५२४ लाभार्थी बालके अपेक्षित आहे. सर्व बालकांना लसीकरणासाठी बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.
लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबतच विविध विभागातून एकूण ३६० कर्मचार्‍यांचेवस्वमसेवकाचे,अरोग्यसेवक,अंगनवाडीसोविका,मदतनिस,आशा सेविका सहकार्य राहणार आहे. त्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, १० मोबाईल टीम, २० ट्रान्झिट टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …