Breaking News

*मराठीत शिक्षण असल्याने अडकल्या नियुक्त्या* *आझाद मैदानावर उपोषण सुरु* *महाराष्ट्रातच मायबोली मराठीला घरचा अहेर*

*मराठीत शिक्षण असल्याने अडकल्या नियुक्त्या*

*आझाद मैदानावर उपोषण सुरु*

*महाराष्ट्रातच मायबोली मराठीला घरचा अहेर*

मुख्य संपादक – किशोर ढुंढेले

मुंबई ः दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत झाल्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये पोर्टलद्वारे गुणवत्तेवर निवड झालेल्या तसेच कागदपत्रांची पडताळणी होऊनही अद्याप नियुक्ती न मिळालेले उमेदवार मुंबई महापालिकेविरोधात मुंबई येथे आझाद मैदानावर सोमवार ( ता . १ ) पासून उपोषणाला बसणार आहेत . हे उमेदवार राज्यातील विविध भागांतील आहेत . शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता असूनही केवळ मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे डावलले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे . या विद्यार्थ्यांचे व्यावसायिक शिक्षण ( डी.एड , बी.एड ) इंग्रजीत असल्याने पवित्र पोर्टलद्वारा मुंबई महापालिका ‘ असा प्राधान्यक्रम आला . मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी ऑगस्ट २०१ ९ महिन्यात पवित्र पोर्टलद्वारे या भावी शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध झाली होती*
*त्यांच्या कागदपत्रांची पडताळणीही झाली . मात्र त्यातील प्राथमिकच्या १५० विद्यार्थ्यांना अद्यापही नियुक्ती मिळाली नाही . या विद्यार्थ्यांचे अकरावी , बारावी व डीएडचे शिक्षण इंग्रजीत माध्यमातून झाले तरीसुद्धा दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकल्याने त्यांना दीड वर्षानंतरही नियुक्तीपत्र दिले नसल्याची खंत या भावी शिक्षकांनी व्यक्त केली . सरकार एकीकडे मातृभाषेत शिक्षणाची सक्ती करीत असतानाही ही वेळ आली असल्याने या उमेदवारांनी शिक्षण आयुक्त , महापौर , अधिकारी , पदाधिकारी , नेतेमंडळींची भेट घेतली , मात्र त्यात फक्त आश्वासने मिळाली . यामुळे ते आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत*

*”सर्व परीक्षा नियमानुसार उत्तीर्ण होऊन आमची निवड झाली आहे . परंतु आमचे दहावीपर्यंतचे माध्यम मराठीत असल्याने डावलले जात आहे . एकीकडे मराठीचा अभिमान बाळगायचा तर दुसरीकडे मराठीत शिक्षण झाल्याने डावलायचे , अशी अवस्था आहे “*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …