Breaking News

*सप्तरंग मंडळ नागपूर विजेता तर ओम अमर क्रीडा मंडळ नागपुर उपविजेता* *अटीतटीच्या सामन्यात सप्तरंग क्रीडा मंडळ अवघ्या 2 गुणाने विजयी*

*सप्तरंग मंडळ नागपूर विजेता तर ओम अमर क्रीडा मंडळ नागपुर उपविजेता*

*अटीतटीच्या सामन्यात सप्तरंग क्रीडा मंडळ अवघ्या 2 गुणाने विजयी*

कामठी प्रतिनिधि – सुनील चलपे

कामठी –  तालुक्यातील रनाळा येथील सुभाष क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पुरुष गट खुले ओपन गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या सामन्यात सप्तरंग क्रीडा मंडळ यांनी ओम अमर क्रीडा मंडला 2 गुणांनी मात देत विजेतेपद पटकाविले
पुरुष गट ओपन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नवीन कामठी चे पोलीस निरीक्षक संजय मेंढे व जुणे पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय मालचे सरपंच सुवर्णा साबळे माझी प स उपसभापती प्रभाकर मोहोळ यांचे हस्ते दिपप्रज्वलन ,वीर बजरंग बली ,नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व क्रीडांगणाची पूजा करून खेळाडूंचा परिचय करुन करण्यात आले सतत 3 दिवस सुरु असलेल्या कबड्डी सामन्यात एकूण 45 संघांनी सहभाग घेतला सेमी फायनल सामन्यात सुभाष किडा मंडळ रनाळा व एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर यांना मात देत दोन्ही चमुनी फायनल सामन्यात प्रवेश घेतला त्यात सप्तरंग क्रीडा मंडळ नागपूर यांनी अवघ्या 2 गुणांनी विजय संपादन केला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांच्या हस्ते विजेता सप्तरंग क्रीडा मंडळ नागपूर यास 31 हजार रुपये रोख पारितोषिक व स्वर्गीय संजय गावंडे स्मृती चषक तसेच उपविजेता संघास 15 हजार रुपये रोख व देवेंद्र मोहोळ तर्फे चषक, देण्यात आले वैयक्तिक पुरस्कार सुशांत मेश्राम तर्फे उत्कृष्ट चढाई तुषार गुरव सप्तरंग क्रीडा मंडळ नागपूर वैभव मुलमुले तर्फे उत्कृष्ट पकड हर्ष देशपांडे ओम अमर क्रीडा मंडळ नागपूर तसेच पंकज इंगोले तर्फे मॅन ऑफ टूर्नामेंट अभिजीत निंबाळकर ओम अमर क्रीडा मंडळ नागपूर यांना देऊन गौरवण्यात आले तसेच सुभाष किडा मंडळाचे संस्थापक माजी सरपंच देवराव आमधरे व प्रो कबड्डी स्पर्धेत एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर चे शशांक वानखडे यांची व उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून सुभाष किडा मंडळ रनाळा चे राजू इंगोले यांना स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रवी गावंडे सुभाष आमधरे, मधुकर गिरी सतीश नवले सुनील चलपे अमोल मोहोळ शुभम नवले बाबा ठाकरे बादल गिरी वैभव मुलमुले सुरज गिरी अनुप अढाऊ हुकुमचंद ढोरे राजू इंगोले मंगेश मुलमुले संजय मेंढे महेश इंगोले उमेश गिरी उमेश. पोचपोंगले संदेश लोणारे रोशन नवले रजत गिरी दिगांत गणेर पंकज इंगोले रणजीत लोणारे. लोडबा ठाकरे अभिषेक नवले मयूर गणेर रितिक गावंडे नयन चलपे कुणाल गावंडे अंकित नागपुरे नाना बावणे शुभम भडंग शुभम मते आदित्य मोहोळ आदित्य पोचपोगळे प्रेम गिरी गौरव बडोदिया अंश बडेल आर्यन राऊत तारुण्य इंगोले आकाश पर्तेकी आधी सुभाष क्रीडा मंडळाचे खेळाडू प्रयत्नशील होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …