Breaking News

*मा.श्री सुनिल केदारांचे टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या*

*मा.श्री सुनिल केदारांचे टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्राच्या खुली कोळसा खदान प्रशासना व्दारे निर्माण समस्या जाणुन घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, युवा क्रिडा मंत्री मा.श्री ना सुनिल केदार यांच्या दौर्यात टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम यांनी जंगी स्वागत करून पंचायत अंतर्गत प्रलंबित समस्याशी अवगत केले.
संकल्प श्रमिक सभागृह गोंडेगाव कॉलोनी येथे जिल्हा परिषद टेकाडी (कोख) व गोंडेगाव सर्कल अंतर्गत वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत तीन खुली कोळसा खदानमुळे निर्मित गावात व गावकर्यां च्या समस्या जाणुन घेण्या करिता महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, युवा क्रिडा मंत्री मा.श्री सुनिल केदार यांच्या दौर्या दरम्यान टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता पुथ्वीराज मेश्राम व सदस्यांनी मा.श्री सुनिल केदार यांचे स्वागत करून नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी, स्थानिय युवकांची बेरोजगारी, ४ नंबर व बांधा दफाई यांचे पुनर्वसनाकरिता पट्टे वाटप तसेच इतर प्रलंबित समस्याशी अवगत करून समस्या निवारणा करिता विनती केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे, सभापती मिनाताई कावळे , सह मान्यवर जनप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक प्रामुख्याने मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …