Breaking News

*सरस्वती इंन्स्टिट्यूडमध्ये हुतात्मा दिन साजरा*

*सरस्वती इंन्स्टिट्यूडमध्ये हुतात्मा दिन साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी  -दिलीप येवले
नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित राम कृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजींची पुण्यतिथी ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ यांनी अध्यक्षीय भाषणात उद्बोधन करताना सत्य अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी जसे स्वातंत्र्य मिळवून दिले तसेच यशसंपादन करण्याकरिता प्रत्येकाने सत्याच्या मार्ग अवलंबावा असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्थेचे स्थायी सदस्य प्राध्यापक वसंत हिवरकर यांनी दिली प्रत्येकाने महात्मा गांधी सारखे आदर्श नीतिनियमांनी जीवन व्यतीत करण्याची कास धरावी असे सांगितले. कार्यक्रमाला राम कृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज झगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक विजय वनकर तर आभार प्राध्यापक मंजू अग्रवाल यांनी केले. covid-19 नियमानुसार कार्यक्रम पार पडला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …