Breaking News

*उन्हाळ्या पुर्वी अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी* *कन्हान शहर विकास मंच चे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन*

*उन्हाळ्या पुर्वी अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी*

 

*कन्हान शहर विकास मंच चे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान ग्रामपंचायत च्या कार्यकाळापासुन तर कन्हान – पिपरी नगरपरिषद होऊन सहा वर्ष झाल्या वर ही कन्हान नगर परिषद येथे अग्निशमन यंत्र ची व्यवस्था नगर परिषद प्रशासनाने केली नसुन कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा नेतृत्वात नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना भेटुन या विषया वर चर्चा करुन एक निवेदन देऊन उन्हाळ्यापुर्वी कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी केली आहे .

कन्हान शहराची व्याप्ती वाढल्याने राज्य सरकार ने कन्हान ग्रामपंचायत चे रुपांतर नगर परिषद मध्ये केले असुन सहा वर्ष झाल्या वर ही कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने अग्निशमन यंत्र उपलब्ध केलेले नसुन शहरात आग लागल्याने कामठी , रामटेक नगर परिषद येथुन अग्निशमन यंत्र बोलवावे लागत असुन गाडी येई पर्यंत नागरिकांचे जीवनावश्यक सामग्री जळुन नष्ट होतात त्यामुळे कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची गजर भासली असुन समोर येणार्या उन्हाळ्यात सुर्य देवाचे तीव्र तापमानामुळे आग लागल्याचे प्रकरण घडत असतात . या उन्हाळ्यापुर्वी कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा नेतृत्वात नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांना निवेदन देऊन केली आहे .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रकाश कुर्वे , शाहरुख खान , पौर्णिमा दुबे , सुषमा मस्के , प्रवीण माने , अखिलेश मेश्राम , सोनु खोब्रागडे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …