*महिला बचत गटाचा हळदी-कुंकू कार्यक्रम थाटात संपन्न*
*महिला बचत गटा व्दारे श्रीराम मंदिर निर्माण करिता पाच हजार रूपये दान*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गटा च्या वतीने श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियाना अंर्तगत कांद्री येथे महिलांचा भव्य हळदी-कुंकू कार्यक्रम घेऊन मंदीर निर्माण करिता पाच हजार रूपयांचे दान करण्यात आले.

कान्द्री परिसरातील हनुमान मंदिर,वॉर्ड क्रं.५ येथे भुमिपुत्र महिला स्वयं सहायता महिला गटा च्या वतीने श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान अंर्तगत भव्य हळदी-कुंकु कार्यक्रम दुर्गा वहिनीच्या संयोजिका सौ.सरीकाताई येवले यांच्या अध्यक्षेत व चेतना ऍग्रो प्रोडक्ट च्या संचालिका सौ.चेतनाताई खळतकर, समाजसेविका सुनंदाताई दिवटे, नगरसेविका सुषमा चोपकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सत्कारानंतर अथितींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपीय भाषण व महिला बचत गटाचा वतीने श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण अभियाना करिता बचत गटाच्या अध्यक्षा सौ.अरुणाताई हजारे यांनी महिला बचत गटा व्दारे दान म्हणुन पाच हजार रूपया चा धनादेश मान्यवरांकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.पौर्णिमा ठाकरे यानी तर सुत्रसंचालन सौ.प्रियांका मदनकर यांनी केले. हळदी कुंकू कार्यक्रमात मोठ्या संख्येत बचत गटांच्या महिला उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्विते करिता राखी गभणे,मीरा कुंभलकर, वंदना गडे, प्रिती लांडगे, प्रज्ञा लोणारे, चिंधा बाई भुरे, सुनीता भिवनकर, दुर्गा भुते, अरूणा पोहरकर, विभा पोटभरे, शालिनी बर्वे, पल्लवी शर्मा, राणी लोणारे, रिता मस्के, लीना बनाईत, सुनीता सावरकर, सीताबाई राऊत सह आदीने सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज