Breaking News

*तेजस संस्थे ने टेकाडी च्या परिवारास केली मदत*

*तेजस संस्थे ने टेकाडी च्या परिवारास केली मदत*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी च्या वतीने टेकाडी येथील प्रदीप बावने यांचा मुलीच्या लग्ना करिता अन्न , धान्य , तेल , मसाले व नवरीचा शालु भेट देऊन मदतीचा हाथ पुढे केला .
तेजस बहुउद्देशिय संस्था व प्रशिक्षण केंद्र कामठी च्या वतीने ०१ मे २०१७ पासुन निरंतर गरजु लोकांच्या मदतीला धावुन सेवा कार्य संपुर्ण नागपुर जिल्हयात करित आहे. अशाच मदतीचा हाथ कन्हान जवळील ग्राम पंचायत टेकाड़ी येथील रहिवासी प्रदीप बावने यांचा मुलीचे लग्न दिनांक ०४/०२/२०२१ ला झाले असुन प्रदीप बावने अत्यंत गरिब परिवारातील असल्याने तेजस संस्थेकडे मदतीची मागणी केल्याने संस्थेने आपले कर्तव्य पार पाडुन आपल्या मुली प्रमाणे एका वडील रूपाने तेजस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आगुलेवार व संस्थेचे वरिष्ठ मान्यवरांनी प्रदीप बावने यांचा घरी पाच दिवसा पुर्वी टेकाडी ला पोहचुन अन्न, धान्य, तेल मसाले, जेवणाचे साहित्य व नवरी मुली करिता शालु भेट दिली .
या प्रसंगी संस्थेचे पितामहा श्री महेंद्रजी भुटानी, मार्गदर्शक राजु अग्रवाल (जी.डी), उपाध्यक्ष देवीदास पेटारे, मार्गदर्शक विनोद कास्त्री, रहीम शेख, रमेश महेरोलिया, सदस्य मिस्बाहऊर रहमान, जयराज कोंडूलवार, कन्हानचे पत्रकार श्री मोतीराम रहाटे, श्री कमलसिंह यादव, किशोर वासाडे, निलेश गाढवे आदी प्रामुख्याने उपास्थित होते. श्री प्रदीप बावने हयानी तेजस संस्थचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार आणि सर्व मान्यवरांचे आभार व्यकत केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …