Breaking News

*वरोरा येथे शिवसेना कडून सायकल रैली काढण्यात आली* *केंद्र सरकार ने केलेल्या पेट्रोल, डिझेल,गॅस दरवाढीच्या निषेधार्थ वरोरा येथे भव्य सायकल रॅली काढण्यात आली*

*वरोरा येथे शिवसेना कडून सायकल रैली काढण्यात आली*

*केंद्र सरकार ने केलेल्या पेट्रोल, डिझेल,गॅस दरवाढीच्या निषेधार्थ वरोरा येथे भव्य सायकल रॅली काढण्यात आली*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – शिवसेनापक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य, चंद्रपूर नितीनभाऊ मत्ते यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ वरोरा येथे भव्य सायकल रॅली काढण्यात आली.तसेच शिवसैनिकांनी युवासैनिकांनी केंद्र सरकारच्या महागाई विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेशभाऊ मेश्राम, शिवसेना तालुका प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे, शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, युवा सेना जिल्हा चिटणीस मनिषभाऊ जेठानी, नगरसेवक दिनेश भाऊ यादव, युवासेना तालुका प्रमुख भूषण बुरेले, शिवसेना उपशहर प्रमुख मनीष दोहतारे, उपशहर प्रमुख समीरभाऊ हक्के, उपतालुका प्रमुख शिवसेना लक्ष्मण भाऊ ठेंगने, युवा सेना शहर प्रमुख गणेश जानवे, सोनू पित्तलवार, शेख, तसेच सर्व शिवसैनिक युवासैनिक होते. हे केंद्र सरकार सामान्य गरीब लोकांच्या हिताच नाही असे व्यक्तव शिवसेना जिल्हा प्रमुखचंद्रपूर नितिन भाऊ मत्ते यांनी केल. तसेच शिवसेना तालुका प्रमुख मुकेश भाऊ जिवतोडे यानी केंद्र सरकार च्या विरोधत घोषणाबाजी केली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …