Breaking News

*भाजपा चे टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन*

*भाजपा चे टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड – महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी नरखेड शहर व तालुका भाजपाच्या वतीने तालुका महावितरण कार्यालयावर “टाळा ठोको व हल्लाबोल” आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या ऊर्जा मंत्री यांनी वारोवार वीज बिल कमी करू अश्या पोकळ घोषणा केल्या पण जेव्हा वीज बिल माफी बाबत निर्णय घेण्याचा निर्णय आला. तेव्हा मात्र माझ्या हातात काहीच नाही असे अजवाबदार व्यक्तव्य केले व 72 लक्ष वीज बिल थकीत असणाऱ्या ग्रहाकांचे वीज जोडणी तोडण्याचा मोगलशाई निर्णय घेतला यांचा विरोध करण्यासाठी भाजपा नरखेड शहर व ग्रामीण तर्फे नरखेड महावितरण कार्यालया समोर हा मोगलशाई निर्णय वापस घ्यावा व सर्वसामान्य नागरकीचें वीज बिलात सवलत द्यावी या साठी हल्लाबोल आंदोलन आज सकाळी ११ वाजता महावितरण कार्यालय समोर करण्यात आले. याप्रसंगी उकेशजी चव्हाण उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण,मनोज कोरडे महामंत्री नगर विकास आघाडी, शामराव बाराई सहकार आघाडी महामंत्री नागपूर जिल्हा. मो.इसमाईल बारुदवाले.जिल्हा भाजपा विशेष निमंत्रित सदस्य. सुनील कोरडे नरखेड तालुका अध्यक्ष, संजय कामडे अध्यक्ष नरखेड शहर भाजप, प्रमोदजी वैद्य कार्याध्यक्ष,मनिष दुर्गे महामंत्री भाजपा, विठ्ठलराव बालपांडे, उमेश कळंबे, संदीप मेतकर,स्वप्नील नागापूरे, धनराजजी खोडे, प्रशांत खुरसंगे, दिनेश पांडे रामचंद्र बागडे, सुनील सोनटक्के,प्रविणजी झाडे, मोरेश्वर चरडे,स्वप्नील कामडे, लिलाधर रेवतकर, योगेश निंबूळकर,शंकर बालपांडे, शंकरराव भालेराव,गादीलाल कामडी,प्रमोद कामडी, ,विजय चौधरी,विजय बांदरे, शंकर बारस्कर,सुरेश बारई,,प्रभाकर घरत,जिवण नासरे शहरातील व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा व शेतकरी बंधु उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …