*निलज ला कुस्त्यांच्या आमदंगलने ग्रामस्थ मंत्रमुग्ध*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – ग्रामिण भागातील पुरातन कुस्त्याचा आम दंगल निलज (खंडाळा) गावात परिसरातील नवयुवा पहेलवांनानी कुस्ती खेळुन आपल्या वर्षा भरात व्यायाम करून शरीरयष्ठी बनवुन जणु कुस्तीतील कला कौशल्याची परिक्षाच दिल्याने ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले.

गुरूवार (दि.०४) फेब्रुवारी ला पंचकोशीत हे गाव आखड्यासाठी नावलौकिक असल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान निलज व शिवशक्ती आखाडा व्दारे दरवर्षीप्रमाणे कुस्त्याचा आमदंगल रामटेक क्षेत्राचे माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव, विदर्भातील नामांकित पहेलवान कोठीराम चकोले, कुस्तीगीर परिषदेचे दयाराम भोयर, जि प सदस्य व्यंकटेश कारेमोरे, दुरसंचार समिती सदस्य कैलाश खंडार, माजी नगर सेवक गणेश भोंगाडे, प स सदस्य नरेश मेश्राम, सरपंच पंकज टोहणे यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये विधीवंत पुजन करून आमदंगलची सुरूवात करण्यात आली. प्रथम छोटे पहेलवान अर्थव निलज व संकेत चिरव्हा तसेच नशीब पहेलवान निलज व अंकीत पहेलवान नागपुर यांची कुस्ती चांगलीच रंगत झाली. निलज परिसरातील नवयुवा पहेलवानानी प्रचंड प्रतिसाथ देत तरूणांना कुस्तीचे व्यसनच जडल्याचे येथे दर्शनिय होते. वर्षभरात व्यायाम करून सदृढ शरीरयष्ठी बनवुन जणु व्यायाम व कुस्तीतील कला कौशल्याची परिक्षा सर्वाच्या साक्षीने दिली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता देवराव चकोले, गुंडेराव भुते, पंकज टोहने, डोमाजी चकोले, रविंद्र चकोले, धनराज चकोले, रामाजी पाहुणे, कचरू पाहुणे, दुर्योधन चकोले, रामाजी भुते, रमेश पाहुणे, विष्णु पाहुणे, राजेंद्र मेश्राम, रामचंद्र चकोले, कवडु खंडाटे, कृष्णाजी कारेमोरे, नरेश मडावी, शेषराव चकोले, गुंडेराव चकोले, मुकुंदाजी धावडे, सारंग चकोले सह गामस्थानी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज