Breaking News

*निशुल्क आरोग्य महाशिबीर संपन्न*

*निशुल्क आरोग्य महाशिबीर संपन्न*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले 

नागपुर:- ताजुद्दिन बाबा जन्म दिनानिमित्त आयोजित नि:शुल्क रोग निदान व शस्त्रक्रिया चे आरोग्य महाशिबीर बडा ताजबाग, ताजबाग शरीफ नागपूर , येथे नुकतेच संपन्न झाले. श्री.जि.एम.कुबडेजी -प्रशासक हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट यांच्या हस्ते या महाशिबीराचे उट्घाटन झाले. यावेळी शेकडो नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन रोगनिदान शिबिर चा लाभ घेतला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना बदरुदुजा इरशाद, विशेष अतिथी संयोजक निखिल भुते, हाजी अबुल हसन ताजी, सैय्यद नाजिम अली, मिसेस नागपूरकर विजेत्या प्रविणा दाढे, यांची प्रामुख्याने या कार्यक्रमात उपस्थिती होती.

यावेळी नेत्र रोग विशेषज्ञ यादव मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे डॉ.एस.एस.यादव, संघर्ष एज्युकेशन व हेल्थ केअर चे डॉ.विनोद कुमार, यांचे टिमसह, दंत विशेष तज्ञ डॉ.शितल सोनी, प्रादेशिक मनोरुग्णालय चे डॉ.दिपक अवचट, ऍक्युप्रेशर तज्ञ मोहनजी वैरागडे, फिजिओथेरपिस्ट डॉ.पुजा चांदरकर,डॉ.तेजस्विनी काळबांडे, मंगेशजी भिवगडे, यावेळी औषधी वितरण करण्यात आले व निशुल्क मोतियाबिंद ऑपरेशन नोंदणी केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फैजाने-ए-ताजुल औलिया एज होम व निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान टीमचे रिजवान खान,वसिम शा, शेक आसिफ, खालिद भाई,मुनवर आलम,शेख हुसेन,अलवाज शाहिद, वसीम अख्तर,इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या यामध्ये विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आमदार मोहन मते,महाभवानी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे अध्यक्ष पांडुरंग मेहर, निशांत जाधव तसेच बरेच मान्यवरांनी भेटी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन निखिल भुते, प्रास्ताविक मौलाना इरशाद, आभार प्रदर्शन नाझिम अली यांनी केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …