*गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांत पलटवण्यात असामाजिक तत्व सक्रिय*

*पेट्रोल,डीझेलचे भाव वाढल्याने गँस सिलेंडर तीन चाकी वाहनात वापर जोमात.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – देशात, राज्यात तसेच शहरात देखील पेट्रोल व डीझेलचे भाव दिवसे दिवस वाढत चाललेले आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच जगन भयंकर त्रास दायक झाले आहे. तरी देखील पेट्रोल व डिझेल वाहन धारक नाहीलाजाने वाढीव दराला समाधान मानावे ला गते. या उलट शहरात दिवसेंन दिवस ऑटोरिक्षा एल.पी.जी. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत होत असुन त्या अनुषंगाने शहरात ऑटो एल.पी.जी. गॅस पंपाची संख्या सुध्दा वाढलेली आहे. काही ठिकाणी मुबलक प्रमाणात ऑटो एल.पी.जी.चे वितरण पंप स्टेशन्स वरून एल .पी.जी. वाहनधारकांना पुरवण्यात येते. पंरतु पेट्रोल व डीझेल सोबत एल.पी.जी. गॅस पंपाचा दरात वाढ होत असल्याने घरगुती सिलेंडरचे दर जास्त प्रमाणात न वाढल्याने काही टोळ्या तसेच असामाजिक तत्व, व्यक्ती घरगुती वापरातील सबसिडी धारकांचे एल.पी.जी. गॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये पलटी करून वापरात आणतात. या टोळ्या तसेच व्यक्ती थोड्याफार पैशासाठी स्वतः सोबत परिसरातील नागरिकांचा जिव धोक्यात घालुन अवैधरित्या दोन ते तीन हजाराचा किंमतीच्या मशीन बाजारात सहज उपलब्ध होत असुन किंवा कुणा कडून बनवुन घेऊन एल.पी.जी. वाहनात उपयोग करीत आहे. घरगुती एल.पी.जी. गॅस सिलेंडर धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याना वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसुन घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करून वाहन धारकांना पुरविले जातात, त्यामुळे सबसिडी धारकांना नेहमीच एल.पी.जी. गॅस सिलेंडर चा तुटवड्याचा सामना करावा लागतो. सणांचा महिन्यात सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तारेवरची कसरत महिलां व पुरूष मंडळीला करावी लागते. नाइलाजास्तव त्यांचा हक्काची सबसिडीचे हेच गॅस सिलेंडर अशा टोळ्याकंडुन अवैध (ब्लॅक) मध्ये घेण्याची नामुष्की सामान्य नागरिकांना येते. आता मात्र नित्याचेच होत आहेत.
अवैध गॅस पुरवण्यासाठी कन्हान-पिपरी, कांद्री, कोळसा खदान परिसरात व कामठी ग्रामीण भागात अनेक कार्यरत आहेत. पोलीस प्रशासन, संबधित अन्न पुरवठा अधिका-यांनी त्वरीत कार्यवाही करून परिसरात सर्व अवैधरित्या एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा काळा बाजार व घरगुती एल.पी.जी. वाहनात वापरण्या-यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी आता जोर धरु लागली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज