*कन्हान येथे सुरु असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करण्याची मागणी*

*शिवसेना महिला पदाधिकार्यांनी नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दिवसन दिवस अवैध धंधे मोठ्या प्रमाणात सुरु असुन कन्हान पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई न करत असल्यामुळे शिवसेना महिला पदाधिकार्यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचा नेतृत्वात नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन कन्हान येथे सुरु असलेले अवैध धंधे बंद करण्याची मागणी केली आहे .

कन्हान परिसरात अवैध धंधे मोठ्या प्रमाणात सुरु असुन शहरातील कायदा व सुव्यवस्था विस्तळीत झाली असुन कन्हान पोलीस प्रशासन या कडे लक्ष देत नसुन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे .

कन्हान परिसरात अवैध रेती , अवैध कोळसा , अवैध देशी दारु व मोहफुल दारु विक्री , जनावरे , गांजा , जुगार व अन्य अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असुन कन्हान पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्यामुळे शिवसेना महिला पदाधिकार्यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचा नेतृत्वात नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना निवेदन देऊन कन्हान शहरात सुरु असलेले अवैध धंधे बंद करण्याची मागणी केली आहे . अन्यथा शिवसेना महिला पदाधिकार्यां च्या वतीने कन्हान पोलीस स्टेशन समोर आमरन उपोषण करण्यात येईल असा ईशारा दिला आहे .
निवेदनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख शुभांगी घोघले , मनिषा चिखले , कोमल लांजेवार , वैशाली थोरात , जोशीला उके , लीना हारोडे , सह मोठ्या संख्येत शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज