Breaking News

*पेरमिली येथे उप पोलिस स्टेशनमध्ये आरोग्य शिबीर संपन्न* *विलास गावडे यांचा सत्कार*

*पेरमिली येथे उप पोलिस स्टेशनमध्ये आरोग्य शिबीर संपन्न*

*विलास गावडे यांचा सत्कार*

पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग
पेरमिली – येथे उप पोलिस स्टेशनमध्ये आरोग्य शिबीर व सत्कार करण्यात आला यावेळी प्रस्तावना प्रभारी पोलिस अधिकारी पंकज सपकाळे यांनी सांगितले की आपण जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने शिक्षण ‌घेवुन आपन उंच पदावर जावु शकतो गडचिरोली जिल्हा हा अति दुर्गम असून यीतूनही आपन उंच भरारी घेऊ शकतो विलास गावडे हा एक शेतकऱ्यांचा मुलगा असुन त्यानी युपीएससी परीक्षेत 145 क्रमांकावर आले असून त्याचा आदर्श ठेवून आपण शिक्षण घेतले पाहिजे यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सतीशचंद्र शर्मा असिस्टंट कमांडंट बोलताना सांगितले की आपल्या भागांत अनेक विद्यार्थी असुन ते समाजातील प्रत्येक मनुष्याला आपल्या भविष्याची स्वप्ने पाहत आपन शिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलत होते यावेळी विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला. वन विभागाचा योजनेची माहिती दिली यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते
यावेळी. प्रमुख अतिथी म्हणून पेरमिली चे सरपंच प्रमोद आत्राम.वैघकीय अधिकारी इशान तुरकर.वन परिक्षेत्र अधिकारी पवार.वेघकिय अधिकारी सलुजा.गणेश मडावी.आदि पाउने उपस्थित होते संचालन पोलीस अधिकारी पवार यांनी केले आभार पोलिस अधिकारी देशमुख यांनी मानले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …