Breaking News

*पाटणसावंगीत ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध* *सरपंच पदी रोशनी ठाकरे व उपसरपंच पदी दीपक दलाल*

*पाटणसावंगीत ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध*

*सरपंच पदी रोशनी ठाकरे व उपसरपंच पदी दीपक दलाल*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
पाटणसावंगी – पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्या राहत्या गावी व 17 सदस्य असलेल्या येथील ग्रामपंचायतमध्ये आज झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली, सरपंच पदी रोशनी सुधीर ठाकरे तर उपसरपंच पदी दीपक चक्रधर दलाल यांची निवड झाली, येथिल ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस चे 15 तर भाजप चे 2 सदस्य निवडून आले होते, विरोधात कमी सदस्य निवडून आल्याने सरपंच पदासाठी रोशनी ठाकरे व उपसरपंच पदासाठी दीपक दलाल यांनी अर्ज केला विरोधात कुणीही अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

नवनियुक्त सरपंच, उपसरपंचाचे ढोलसाच्यात गजरात मिरवणूक काढून पुष्पहाराने स्वागत केले, ही निवडणूक प्रकिया अध्याशी अधिकारी म्हणून डी.एन. पोतले व ग्रामविकास अधिकारी बबन शृंगारे याच्या देखरेखीत पार पाडली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …