Breaking News

*उखडू लागला दोन महिन्याआधीचा सिमेंट रोड* *थातुरमातुर तर्हेने सिमेंट रोड बांधकाम केल्याचा आरोप*

*उखडू लागला दोन महिन्याआधीचा सिमेंट रोड*

*थातुरमातुर तर्हेने सिमेंट रोड बांधकाम केल्याचा आरोप*

मुख्य संपादक  किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेरः नगरपालिकेच्या सटवामाता परिसर वार्ड क्र.5 येथे बस स्थानक ते सटवामाता मंदीर या मुख्य रस्त्यावर अंदाजे तीन महिन्या आधी सिमेंट रोडचे बाधकाम करण्यात आले होते.सदर बांधकाम इतक्या निष्कु्ष्ट दर्जाचे आहे की आतापासूनच रस्त्यावरील गिट्ट्या उखडू लागल्या असुन सदर रस्त्यावर पडुन अनेकांना आपले हातपाय मोडावे लागत आहे परत मागील दोन दिवसापासून सदर रस्त्यावर ड्रील मशीन व्दारे अंदाजे दोनते तीन इंच खोलीचे खड्डे पाडल्या जात असल्याने सदर रोडावर पाई चालने ही कठीण होत असल्यामुळे नागरिकात रोष व्याप्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काही महीण्याआधी तयार झालेला हा सिमेंट रोडची दैनावस्था बघुन परिहरातील युवकांनी आज त्याच रस्त्यावर नगर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त करत सिमेंट रोडचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार व त्या बांधकामावर नियंत्रण ठेवणार्या अभियंता व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी तसेच सदर कांत्रटदाराकडुन त्याच मंजूर राशीतुन सदर सिमेंट रोडचे बांधकाम करुण देण्याची मागणी केली आहे.

तीन महिन्यांतच सिमेंट रोड़ची दैनावस्था होत असलेल्या विषयावर प्रभागातील नगरसेवक व नगर प्रशासनाच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचे मते जेव्हा सदर सिमेंट रोड तयार झाल्या त्यावेळी मुसळधार पावसामुळे सदर रस्त्यावरूण सिमेंटची लस अधिक प्रमाणात वाहुन गेल्याने खडी उघड्या पडू लागल्याने त्या रस्त्यावर दोन ते तीन इंच खोलीचे खड्डे करुण त्या सिमेंट रोडवर परत दोनते तीन इंचाचा भरणा करुण दुरुस्ती करण्याचे कार्य सुरु असल्याची माहीती दीली.

नगर प्रशासनाद्वारे केलेल्या या निष्कुष्ठ दर्ज्याच्या बांधकामाच्या विरोधात युवा नेते विनीत पाटील, अभिषेक दास, राजकुमार गाडकोंडले आदिंच्या नेतृत्वात अक्षय नकाशे, भूषण आवारी, पवन राऊत, मोनू देरकर,दिनेश मचले, अनुज चांदेकर, मुकेश कमाले, शंकर नेवारे, बलराम हजारे, दीपक गोखे, देवानंद ठाकूर, अक्षय आवारी, अमर भाऊ, लाला बनसोड, दादू बनसोड, प्रणय चांदेकर, कुणाल शेंडे, भरत ढूंढेले, सुनील धुर्वे, वैभव खाटिकर, मंगेश चवारे, रुपेश कमाले, अजय महाजन,विकी शेंडे आदिनी विरोध नोंदवीत निदर्शने केल.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …