*महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा महिला आघाडी, उमरेड तर्फे संक्रांत मेळावा व महिला मेळावा बलसोना लॉनमध्ये संपन्न*

उमरेड – महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा महिला आघाडी उमरेड च्यावतीने उमरेड परिसरातील तेली समाजातील महिलांनी पुढाकार घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा वर्धा जिह्याचे खा. मा. रामदासजि तडस साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि महाराष्ट्र राज्य युवा आघाडी प्रदेश उपाध्यक्ष जगदीश वैद्य यांच्या नेतृत्वात व विभागीय उपाध्यक्षा प्रा. डॉ. सुषमाताई लाखे व जिल्ह्यातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून उमरेड शहरात भव्यदिव्य महिला मेळाव्याचे आयोजन बालसेना लॉन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या माजि महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर तथा सहसचिव महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा महिला आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण सावित्रीबाई ढोबळे, प्रमुख अतिथी विभागीय अध्यक्षा नयनाताई झाडे , विभागीय उपाध्यक्ष माननीय प्रा. डॉ. सुषमाताई लाखे, जिल्हाध्यक्ष मंजूताई कारेमोरे, विशेष अतिथी मा. संध्याताई पारवे, रंजनाताई रेवतकर, अलकाताई रेवतकर, सविताताई कुलरकर,डॉ धांडे मॅडम, नगरसेविका रेणुकाताई कामडि, नगरसेविका अरुना हजारे, नगरसेविका विनाताई घुमडे, नगरसेविका योगिता इटनकर, उमरेड महिला आघाडी अध्यक्षा गीताताई आगासे, इत्यादी महिलांची मंचावर उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी समाज समाज बळकट करून एका प्लॅटफॉर्मवर आपण सर्वांनी एकत्र यावे असे खूप मोलाचे मार्गदर्शन केले प्रा.डॉ. सुषमा लाखे यांनी समाजातील प्रत्येक महिलांनी समाजाच्या प्लॅटफॉर्मवर पुढे यावे आणि संघटन मजबूत करावे संघटनेची ताकद ही फार मोठी ताकद असते संघटना म्हणजेच आपला एक अडचणीच्या वेळी धावून येणारा परिवार आहे उमरेड परिसरात महिलांचं एक सुंदर संघटन नक्कीच बनेल.

आमच्या महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या माध्यमातून असेच नियमित कार्यक्रम आपल्याकरिता घेण्यात येईल आपलं सहकार्य नेहमीच आमच्या पाठीमागे असू द्या. अध्यक्षीय भाषण माजी महिला व बालकल्याण सभापती सावित्रीबाई ढोबळे यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यातून समाजातील महिलांनी आपले सर्व काम सांभाळून बाहेर निघावे राजकीय हेवेदावे सर्व बाजूला सारून समाजाच्या प्लॅटफॉर्मवर एकत्र यावे तो समाजाचा प्रश्न असो की ओबीसींच्या प्रश्न असो त्याकरिता फार मोलाचे महिलांकरिता मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक महिलांना नियुक्तिपत्र सुद्धा देण्यात आले . कार्यक्रमात महिलांकरिता मनोरंजनात्मक वेगवेगळे हसी खेळीच्या वातावरणात वेगवेगळया स्पर्धा, उखाणे,गेम्सचे नियोजन करण्यात आले अनेक महिलांनी सहभाग घेतला समाजातील महिलांनी खूप मोठा प्रतिसाद दिला उमरेड परिसरातील तेली समाजातील महिलांकरिता प्रथमच खूप मोठे प्लॅटफॉर्म महिलांकरिता महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा महिला आघाडीने दिलेले आहे या कार्यक्रमाचे सुंदर असे प्रास्ताविक महिला आघाडी अध्यक्षा गीता आगासे यांनी केले यांनी आपल्या वक्तव्यातून आज आपल्या परिसरात महिलांकरिता ही सुवर्णसंधी ज्यांनी दिली असे प्रदेशचे उपाध्यक्ष सर्वसामान्य समाजाचे युवा व्यक्तिमत्त्व जगदीश वैद्य यांच्या माध्यमातून आलेली ही एक सूवर्ण संधीच आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून संबोधित केले कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन उमरेड शहर महिला आघाडी सचिव नंदिनीताईं वासुरकर यांनी केले तर आभार कोशाध्यक्ष लताताई बेले यांनी मानले. जवळपास ३०० पेक्षा जास्त महिलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मीनाताई दहाघाणे, वर्षाताई गिरडे, मनीषा मुंगले, सुरेखा गोल्हर, वैशालीताई बांद्रे, सौ दर्शनाताई घुघुसकर, सौ राजश्री भुसारी, चैताली वंजारी, रजनी बेले, मनीषा येवले, सध्याताई वैद्य, हर्षा वाघमारे, माधुरी पडोळे, इत्यादी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला कार्यक्रमाला अनेक समाजबांधवांचे आर्थिक सहकार्य लाभले.
Maharashtra News Media सच की आवाज