*पारशिवनी तालुक्यात सरपंच व उपसरपंच निवडणुकी मध्ये महाविकास आघाडी चा विजय*
*शांततेत पार पडली सरपंच व उपसरपंच निवडणुक*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील दहा गट ग्राम पंचायत च्या सरपंच व उपसरपंच निवडणुकी मध्ये कॉंग्रेस चे ५ सरपंच, व ६ उपसरपंच, शिवसेने चे ३ सरपंच, व ४ उपसरपंच आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी चे १ सरपंच निवडुन आल्याने विरोधी पक्षाचे खाते न उघडल्याने या निवडणुकीत पारशिवनी तालुक्यात महाविकास आघाडी ने विजय मिळविला आहे.
गट ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ च्या पारशिवनी तालुक्यात १० ग्राम पंचायती च्या सरपंच व उपसरपंच पदाकरिता गुरूवार दिनांक ११ ला निवडणुक घेण्यात आली.
१) बोरी (सिंगारदिप) गट ग्राम पंचायत मध्ये सरपंच पद अनुसुचित जाती स्त्री करिता राखीव होते. परंतु अनु.जाती स्त्री उपलब्ध नसल्यामुळे व एक ही नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने सरपंच पद रिक्त आहे. तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वसाधारण पदात सौ शुभांगी अशोक टोहणे निवडुन आल्या. २) खेडी गट ग्राम पंचायत मध्ये बोरी (राणी) कॉंग्रेस च्या सौ छाया प्रकाश कोकाटे नामाप्र स्त्री राखीव पदात सरपंचा निवडुन आल्या . तर खेडी कॉंग्रेस च्या संगिता देवराव इंगळे सर्वसाधारण पदातुन उपसरपंच म्हणुन निवडुन आल्या. ३) निमखेडा गट ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेस च्या सौ कलावती सुभाष तडस सर्वसाधारण स्त्री पदात सरपंचा निवडुन आल्या . तर कॉंग्रेसचे देवा कचरू डोंगरे सर्व साधारण पदात उपसरपंच म्हणुन निवडुन आले. ४) खंडाळा गट ग्रामपंचायत मध्ये गहुहिवरा शिवसेने च्या विमलबाई शालीकजी बोरकुटे सर्व साधरण पदात तर खंडाळा कॉंग्रेस चे चेतन रमेश कुंभलकर सर्वसाधारण म्हणुन निवडुन आले. ५) माहुली गट ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेसचे प्रेमचंद रामदास कुसुंबे नामाप्र पदात सरपंच निवडुन आले . तर शिवसेनेच्या सौ माया माणिकचंद अमृते सर्वसाधारण पदात उपसरपंच निवडुन आले. ६) नवेगाव खैरी गट ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेसचे कमलाकर तुळशीराम कोठेकर सर्वसाधारण पदात सरपंच निवडुन आले . तर कॉंग्रेसचे राजु श्रावण पुरकाम उपसरपंच पदी निवडुन आले. ७) आमगाव गट ग्रामपंचायत मध्ये कॉंग्रेसच्या सर्व साधारण स्त्री पदात सौ मायाताई इंद्रपाल गोरले सरपंचा निवडुन आल्या . तर सर्वसाधरण पदात रमेश शिवरकर उपसरपंच निवडुन आले. ८) पिपळा गट ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी चे सर्वसाधारण पदात सचिन खुशाल आमले सरपंच निवडुन आले तर कॉंग्रेसचे सर्वसाधरण पदात गौतम विठ्ठल गजभिये उपसरपंच निवडुन आले.९) इटगाव गट ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेचे नामाप्र पदात अतुल पाडुरंग काळे सरपंच निवडुन आले तर सर्वसाधारण पदात शिवसेनेचे ज्ञानेश्वर मनोहर वासे उपसरपंच म्हणुन निवडुन आले. १०) सुवरधरा गट ग्रामपंचायत मध्ये अनु.जमाती स्त्री पदात शिवसेनेच्या केशवंता ग्यानेश्वर इडपाची सरपंचा निवडुन आल्या तर सर्वसाधारण पदात शिवसेनेचे गजु विठोबा सावरकर उपसरपंच निवडुन आल्याने कॉंग्रेस चे ५ सरपंच, व ६ उपसरपंच, शिवसेने चे ३ सरपंच, व ४ उपसरपंच, आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी चे १ सरपंच निवडुन आल्याने विरोधी पक्षाचे सरपंच, उपसरपंच निवडणुकीत खाते सुध्दा न उघडल्याने महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे .
Maharashtra News Media सच की आवाज