Breaking News

*नगर पंचायतीच्या आढावा सभेत आमदार डॉ देवरावजी होळी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले* *नगर पंचायत क्षेत्रातील विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे दिले निर्देश*

*नगर पंचायतीच्या आढावा सभेत आमदार डॉ देवरावजी होळी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले*

 

*नगर पंचायत क्षेत्रातील विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचे दिले निर्देश*

 

गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

 चामोर्शी – चामोर्शी नगर पंचायत क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांची विकास कामे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्रलंबित असून सदर कामे पुढील ७ दिवसात सुरू करण्यात यावे अन्यथा नव्याने निविदा प्रकिया राबवून कामे तातडीने सूरू करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी चामोर्शी नगर पंचायतीच्या आढावा सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आढावा बैठकीला नगर पंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी तोडसाम साहेब तहसीलदार शिकतोडे, न प.मुख्याधिकारी चौधरी, भूमिअभिलेख चे झिलपे, दुय्यम निबंधक यांचेसह भाजपा तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, साईनाथजी बुरांडे, प्रामुख्यानं उपस्थित होते.

चामोर्शी नगराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.नगरोत्थान अभियानांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून 2019 20 करिता १ कोटी 23 लाख , 2020 -21 चे 89 लक्ष 40 हजार, नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2019 -20 करिता 2 कोटी 32 लक्ष ,2020 -21 करिता 2 कोटी 11 लाख, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत 2019 -20 करिता 1 कोटी 14 लक्ष, 2020-21 करिता 1 कोटी 40 लक्ष, अग्निशमन सेवा व बळकटीकरण योजनेअंतर्गत 2019-20 करिता 89 लक्ष,रस्ते अनुदान अंतर्गत 2019-20 मध्ये 20 लक्ष, नवीन नगरपंचायत अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 25 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त होऊन सुद्धा अजून पर्यंत कामे करण्यात आले नाही.त्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच चामोर्शी नगरातील मालमत्ता कर व पाणी कराची एकूण मागणी लक्षात घेता असलेली वसुली अत्यल्प असून 31 मार्चपर्यंत वसुली करून त्या निधीचा उपयोग चामोर्शी शहराच्या विकासासाठी करावा असे निर्देशही दिले नगरपंचायत अंतर्गत असणारी रिक्त पदे शासनाकडून भरवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असून नगरपंचायत डी.पी.प्लॅन संबंधित ठेकेदाराच्या यंत्रणेने काम न केल्याने प्रलंबित आहे त्यामुळे पुढील एक महिन्याच्या आत ते काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सिटी सर्वे अंतर्गत नगरपंचायत क्षेत्रात तात्काळ सुरू करण्यात यावा. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 234 प्रस्ताव म्हाडाकडे प्रस्तावित असून त्यास अजून पर्यंत मंजुरी न मिळाल्याने आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर दहन दफनभूमी कामांचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करून पुढील कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …