*अस्मिता ऑरगॅनिक फार्म तर्फे आयोजित शिबिर संपन्न*

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
रामटेक – तालुक्यातील सत्रापुर या शिवारात अस्मिता ऑरगॅनिक फार्म तर्फे आयोजित, विदर्भात कोणत्या प्रकारचे मसाल्यांचे पीक प्रामुख्याने घेता येऊ शकते याबद्दल विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री.मुजफ्फर हुसैन (माजी आमदार,विधानपरिषद महाराष्ट्र) यांच्यातर्फे करण्यात आला होता.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.ना.श्री.सुनील केदार (मंत्री,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण,महाराष्ट्र राज्य) मा.श्री.रणजित कांबळे (माजी मंत्री,आमदार),मा.श्री.आशिष जयस्वाल (आमदार,रामटेक विधानसभा क्षेत्र) हे उपस्तीत होते.
तसेच विशेष मार्गदर्शन वक्ते म्हणून डॉ.एम,एन,वेणूगोपाल(माजी प्रमुख, स्पाइसेस(ICAR)इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च),श्री.सय्यद सलीम (वरिष्ठ अधिकारी, भारतीय वन विभाग),श्री.हेमंत चव्हाण(ऑरगॅनिक फार्मिंग तज्ञ) आदी उपस्तीत होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक श्री.मुजफ्फर हुसैन यांनी केले.तसेच त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने “A MART FRESH” या मोबाईल अँप्स ची व्यवस्था करण्यात आली आहे.या अप्स द्वारे शेतकरी स्वतःचे माल स्वतः विकू शकतो.आणि हे अँप्स सर्व भारतामध्ये उपयोगात येणार आहे असे सांगितले.तसेच सत्रापुर येथील शिवारात त्यांची शेती असल्यामुळे गावाजवळील येणाऱ्या बोरडा,सराखा,सत्रापुर,कान्द्री,बोन्द्री या पाचही गावात आपल्या संस्थेच्या वतीने शिक्षण,आरोग्य आणि पाण्याच्या संदर्भात संपूर्ण जबाबदारी घेण्याचे वक्तव्य त्यांनी केले.या पाचही गावातील मुलं शिक्षण,आरोग्य तसेच पाणी या सर्व समस्यांमुळे वंचित राहू नये हे तेथील प्रमुख उद्देश दिसून आले.
श्री.सय्यद सलीम यांनी आपल्या मार्गदर्शनात बांबू बद्दल माहिती दिली होती. बांबूचे मानवी जीवनात महत्व व बांबूचे विविध उपयोग याबाबद्दल मार्गदर्शन केले.भारतातील सर्वात पहिले बांबू गार्डन अमरावती येथे स्थापन यांच्याच मार्गदर्शनात तयार करण्यात आली असे त्यांनी सांगितले.तसेच अटल योजने अंतर्गत बांबू लागवड करावी,त्यासाठी शासनातर्फे 50% अनुदान आहे.असे सांगितले.त्यानंतर डॉ.एम,एन,वेणूगोपाल यांनी विदर्भात कोणत्या प्रकारचे मसाल्याचे पीक घेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच मा.श्री.रणजित कांबळे यांनी अध्यक्षीय भाषन केले.व कार्यक्रमाची सांगता केली.यावेळी या कार्यक्रमाला दूरवरून बरीच मंडळी जमली असून जवळपास चे बरेच शेतकरी उपस्तीत होते.
Maharashtra News Media सच की आवाज