Breaking News

*पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या शहिदांना दिली श्रद्धांजली*

*पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या शहिदांना दिली श्रद्धांजली*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – जम्मू – कश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात दोन वर्षापुर्वी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ चे ४० ते ४४ जवान शहिद झाले होते . या अत्यंत निंदनीय घटनेला दोन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करुन शहिद स्मारका वर हार माल्यार्पण व पुष्प अर्पण करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ च्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि दिली .
१४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू – काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर दुपारी च्या सुमारास ३ वाजुन १५ मिनटांनी एका आत्मघाती हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केल्याने भारतीय सीआरपीएफ चे ४० ते ४४ जवान शहिद झाले होते . या अत्यंत निंदनीय घटनेला दोन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी शहिद चौक येथे शहिद स्मारकावर हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ च्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि दिली .

याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , सहसचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , सोनु खोब्रागडे , प्रकाश कुर्वे , सुषमा मस्के , प्रवीण माने , निलकंठ मस्के , अखिलेश मेश्राम , दिपचंद शेंडे , शाहरुख खान सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …