Breaking News

*अनेक प्रलंबित प्रश्नाचे उत्तर मिळाल्यांने पाँवर फ्रंन्ट शाखा खापरखेडा युनियनने मानले मुख्य अभियंता यांचे आभार*

*अनेक प्रलंबित प्रश्नाचे उत्तर मिळाल्यांने पाँवर फ्रंन्ट शाखा खापरखेडा युनियनने मानले मुख्य अभियंता यांचे आभार*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

खापरखेडा:- पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार संघटनेच्या संघर्षाला यश आले. पुष्कळ दिवसापासून मृत कामगाराच्या वारसदारांना न्याय मिळावा याकरिता संघटनेकडून औष्णिक वीज केंद्र खापरखेडा व्यवस्थापनाला वारंवार पत्रव्यवहार केला तसेच माननीय मुख्य अभियंता औष्णिक वीज केंद्र खापरखेडा यांची भेट घेऊन मृत कामगारांच्या वारसदारांच्या दयनीय परिस्थिती बाबतीत अवगत करून दिले व त्याच कार्याची प्रतिपुर्ती म्हणून मृत कामगारांच्या वारसदारांना न्याय मिळाला व त्यापैकी काही महिला वारसदार कामावर रुजू झाल्या त्याकरिता पॉवर फ्रंट कंत्राटी कामगार संघटना शाखा खापरखेडा तर्फे माननीय मुख्य अभियंता, औष्णिक वीज केंद्र खापरखेडा यांचे आभार मानीत आहे त्याचप्रमाणे या कार्याला ज्यांनी हातभार लावला त्या सन्माननीय सामाजिक कार्यकर्त्यांचे व पत्रकारांचे सुद्धा संघटना आभार मानीत आहे व ज्या वारसदारांना न्याय मिळाला नाही त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा ही विनंती संघटनेतर्फे माननीय मुख्य अभियंता यांना करण्यात येत आहे. याप्रसंगी संस्थेचे प्रमुख नचिकेत मोरे, राज्य सचिव रोशन गोस्वामी, खापरखेडा अध्यक्ष भुपेंन्द्र चतुवैदी, अनिल बोरकडे, प्रविण हाते, प्रविण लांजेवार, दत्ता शिंदे, महेश फुलझेले आदी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …