*संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती केली साजरी*
*कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे संत श्री सेवालाल महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन संत श्री सेवालाल महाराज यांचा प्रतिमेस हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .

सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ ला संत श्री सेवालाल महाराज यांचा जयंती निमित्य कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सेवालाल महाराज यांचा प्रतिमेस हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नप नगरसेवक डायनल शेंडे यांनी म्हटले कि गोरबंजारा जमातीमध्ये संत सेवालाल महाराज हे माेठे संत हाेऊन गेले. संत सेवालाल महाराजांचा जन्म माघ कृष्ण पक्ष साेमवार, दि. १५ फेब्रुवारी १७३९ राेजी बंजारा कुटुंबामध्ये गुलाल डाेडी तांडा, ता. गुत्ती, जि. अानंदपूर (अांध्र प्रदेश) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक व अाईचे नाव धरमणी हाेते. बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलांच्या पाठीवर धान्याची गाेणी वाहण्याचा हाेता. भीमा नाईकांना चार पुत्र हाेते. सेवालाल (सेवाभाया), बद्दू, हप्पा, भाणा यांच्यापैकी सेवालाल ज्येष्ठ हाेते. सुरुवातीपासून ते विरक्त स्वभावाचे हाेते. त्या काळी बंजारा समाज निरक्षर हाेता. त्या समाजात अाजही निरक्षरतेचे प्रमाण माेठ्या प्रमाणात अाहे. त्यामुळे सेवालाल महाराजांनी अाजन्म अविवाहित राहून समाज सुधारण्याचे कार्य हाती घेतले. माल वाहतुकीसाठी जगभर बंजारा समाज भटकत हाेता. जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात अाणल्या. याचबराेबर भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले. अाजही बंजारा समाजात एक भाषा व एक पेहराव टिकून अाहे.
नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी म्हटले कि सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ – ४ डिसेंबर १८०६) हे बंजारा समाजाचे संत होते. सेवालाल यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते. कार्यक्रमात उपस्थित सर्व नगर परिषद अधिकारी , कर्मचारी यांनी श्री संत सेवालाल महाराज यांचा प्रतिमेस पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .
याप्रसंगी नगरसेवक डायनल शेंडे , राजेंद्र शेंदरे , हरीष तिडके , शैलेश शेळकी सह नगर परिषद चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज