Breaking News

*” नरखेड तालुक्यातील स्मार्टग्राम ठरले “खापा (घुडन)”* *तालुक्यातील प्रथम पुरस्काराचे गाव सरपंच तथा गावकऱ्यांचे विशेष योगदान*

*” नरखेड तालुक्यातील स्मार्टग्राम ठरले “खापा (घुडन)”*

*तालुक्यातील प्रथम पुरस्काराचे गाव सरपंच तथा गावकऱ्यांचे विशेष योगदान*

नरखेड तालुका प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे

नरखेड –  तालुक्यातील तालुक्यापासून अगदी शेवटाच्या टोकाला असलेले गाव खापा तालुक्यापासून 45 किमी च्या अंतरावर असून , मागील गत वर्षभरात केलेल्या कामांमुळे खापा गावाला तालुका स्तरीय “स्मार्टग्राम” योजनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे , या पुरस्काराचे काल मंगळवारला आर,आर ,पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत आबासाहेब खेडेकर सभागृहात ,जि .प.अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी काही निवडीक ग्रामपंचायतीला वितरीत करण्यात आले . या पुरस्कारामुळे खापा येथील सरपंच प्रमोदजी बन्नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची वाटचाल आदर्शग्राम होण्याच्या दिशेने चालू आहे .

आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन 2018-2019 वर्षांमध्ये खापा (घु) गावाने स्मार्टग्राम योजने अभियानात सहभाग घेऊन गावात विविध उपक्रम राभविले होते ,यामध्ये संपूर्ण गावातील गावकऱ्यांनी शौचालय वापर,गावात व गावाच्या अवती भवती वृक्ष लागवड ,पाणी व्यवस्थापन ,ग्रामपंचायतीचे व गावचे सुशोभीकरण ,स्वच्छ शाळा रंगोटी, सौर पथदिवे ,गावातील शासकीय इमारती रंगरंगोटी ,रस्ते नाल्या सफाई ,अनेक नवीन रस्त्याची निर्मिती तसेच अनेक नाविन्यपूर्ण योजना उपक्रम राबविण्यात आले होते.

खापा (घु) गावाने मागील वर्षभरात गाव स्वच्छतेसंबंधी अनेक विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याने नरखेड तालुक्यात स्मार्टग्राम अभियानांतर्गत प्रथम क्रमांक मिळवीत 10 लक्ष रुपयांचे बक्षीस पटकावले आहे , हा पुरस्कार जि .प.अध्यक्षा रश्मीताई बर्वे , उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते ग्रामपंचयात सरपंच प्रमोदजी बन्नगरे यांना वितरित करण्यात आला ,यावेळी प.स.सभापती सौ. नीलिमा सतीश रेवतकर तसेच उपसभापती ,सर्व सदस्य ,गावाचे ग्रामसेवक कीनकर व जि .प .समस्त अधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …