*तायवाडे महाविद्यालयात कोव्हीड19 च्या रॕपिड टेस्ट चे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- श्री सच्चिदानंद शिक्षण संस्थेच्या तायवाडे महाविद्यालय महादुला – कोराडी येथे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, तायवाडे फार्मसी कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना ,नगर पंचायत महादुला व प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथी
यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात कोव्हीड19 टेस्ट चे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रच्या चमुने डॉ.राहुल राऊत,वैद्यकीय अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केन्द्र गुमथी ,डॉ.संजय माने ,तालुका आरोग्य अधिकारी कामठी ,तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयु तायवाडे, डीप्लोमा ईन फार्मसीचे चे प्राचार्य प्रा.विक्रांत चिलाटे तसेच नगर परिषद महादुला चे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी कॉलेज व तायवाडे कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची कोव्हीड19 ची रॕपिड टेस्ट करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.किशोर घोरमाडे ,डॉ.वकील शेख,डॉ.माचेवार ,डॉ.शरद डवरे ,डॉ.सुनिल भोतमांगे यांनी योगदान दिले.तसेच या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Maharashtra News Media सच की आवाज