Breaking News

*ग्रामीण जनजागृति वर कार्यक्रमाचे आयोजन*

*ग्रामीण जनजागृति वर कार्यक्रमाचे आयोजन*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान /घाटरोहणा : – दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास मंडळ, नागपूर व संकल्प ग्रामोत्थान बहुउद्देशीय संस्था टेकडी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत घाटरोहना येथील अंगणवाडी इमारतीत दोन दिवसीय ग्रामीण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे उद्घाटन घाटरोहणा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.मिनाक्षी बेहुणे यांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमास शिक्षण प्रमोद रत्नपारखी, विकास मंडळाचे शिक्षण अधिकारी गुडलाल चौहान, दामोदर रामटेके, कामिनी आठवले उपस्थित होते. शिक्षण अधिकारी श्री.प्रमोद रत्नपारखी यांनी मंडळामार्फत राबविण्यात येणार्णा विविध प्रशिक्षण व कार्यक्रमांची माहिती देतांना महिला व मजुरांच्या हितासाठी सरकार ने केलेले विकास कार्य व कायद्यांची माहिती दिली. श्री दामोदर रामटेके यांनी जागरूक रहा या विषयावर मार्गदर्शन केले . कामिनी आठवले यांनी महिलांचे आरोग्य व पोषण विषयी माहिती दिली. संस्था सचिव श्री अरविंद कुमार सिंह यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासात बचत-बचत गटांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचे संचालन विद्या गिरहे यांनी केले तर आभार अनिता तांडेकर यांनी मानले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …