Breaking News

*युवा जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी 15 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेल्या अनुदानीत आदिवासी आश्रम शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली*

*युवा जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी 15 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेल्या अनुदानीत आदिवासी आश्रम शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- अनुदानीत आदिवासी आश्रमशाळा मांगरुळ येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना काल दि.14/02/2021 रोज रविवारला 15 विद्यार्थ्यांना पोट दुखणे, डोक दुखणे,जीव मळमळणे , उलट्या होणे असा प्रकार घडला त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना उमरेड येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्यातील 12 विद्यार्थां ची प्रकृती बरी असून त्यातील 1) संजीवनी संदीप गेडाम 2)महेक गेंदलाल परतेकी 3) सुषमा कमलसिंग धूर्वे या तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते .असा प्रकार होऊन सुद्धा कोणत्याही लोकप्रतिनिधींना न कळवता तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना न कळवता परस्पर संमतीने हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला जात होता.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष तसेच गटनेता तथा पंचायत समिती सदस्य राहुल मेश्राम यांनी व नागपूर जिल्ह्याचा समाज कल्याण सभापती नेमावली ताई माटे, जिल्हा परिषद सदस्य शंकर दडमल, पंचायत समिती सभापती ममताताई शेंडे ,पंचायत समिती उपसभापती कृष्णाजी घोडेस्वार ,वैभव लाखे यांनी आश्रम शाळेला भेट देऊन पाहणी केली असता स्वयंपाक गृहामध्ये अस्वच्छता व पाल आढळून आली तसेच स्वयंपाक गृह वेवस्तीत नसून अर्धे टीनाचे आणी अर्धे खुले होते त्यामध्ये भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवाला धोका होऊन अशीच विषबाधा होण्याचे प्रकार नाकारता येत नाही तसेच स्टोअर रूम मध्ये पाहणी केली असता मिरची पावडर मधे मोठ्या प्रमाणात काड्या आढळून आल्या याबाबत राहुल मेश्राम यांनी जाब विचारला असता तेथील अधीक्षकांनी उळवा उळविची उत्तरे दिली असता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या युवा जिल्हाध्यक्षांनी अधिक्षकाचा चांगलाच खरपूस समाचार घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांना जर कमीजास्त झाल्यास मी सहन करणार नाही असा ईशरा दीला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …