Breaking News

*शेतकर्यांना संकटसमयी मदत करणे हे पुण्य कर्म ही छत्रपती शिवाजी महाराजांची निर्देश (शिकवण) होते – प्रभू ठाकरे* *शौर्य,ध्यर्यआणि औदार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज*

*शेतकर्यांना संकटसमयी मदत करणे हे पुण्य कर्म ही छत्रपती शिवाजी महाराजांची निर्देश (शिकवण) होते – प्रभू ठाकरे*

*शौर्य,ध्यर्यआणि औदार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज*

 

कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेला जगात आदर केला जातो.त्याचे शौर्य-धेर्य-आणि औदर्याचा एक विचारधारा बनली आहे. छत्रपती शिवरायांनी तलवार चालवली या मुळे रणांगण गाजविले, तेवढेच प्रेम आपल्या राज्यातील प्रजेवर केले. महाराज जेवढे कर्तव्य कठोर होते तेवढेच आपल्या प्रजेवर प्रेम ही केले.
शेतकर्याच्या भाजीच्या देढाला ही हात लावू नका.विना मोबदला त्यांचे कडून काहीही घेऊ नका, त्यांना संकट समयी मदत करा हेच पुण्याचे कार्य आहे. अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची होती.


असे मत कोंढाळी पोलिसस्टेशन चे प्रभारी ठाणेदार प्रभू ठाकरे यांनी कोंढाळी येथील हुतात्मा स्मारक येथे कोंढाळी येथील मार्दव प्रतिष्ठाणाचे वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजीत जयंती सोहळा प्रसंगी मार्दव प्रतिष्ठाणाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती सोहळा च्या आयोजन प्रसंगी शासन प्रशासनाने कोव्हिड १९चे पालन करत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी रक्तदानाचा कार्यक्रमाचे हीआयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे , उपसरपंच स्वप्निल व्यास, ज्यष्ठ समाजसेवी दुर्गाप्रसाद पांडे, पो उ नि राम ढगे, ब्रजेश तिवारी, प्रमोद धारपुरे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी मार्दव प्रतिष्ठाणाचे वतीने घेण्यात आलेल्या रक्तदानाचे आयोजनात जीवन ज्योती रक्त पिढी यांचे कडे (000)युवकांनी रक्तदान करून जयंती सोहळा साजरा केला.
ग्राम पंचायत कोंढाळी व पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षणार्थी यांनी ही श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …