Breaking News

*कोवीड़ 19 च्या टेस्टींग ला घाबरू नका* *जाणून पाँझेटिव्ह करत असल्यांच्या अफवांवर लक्ष देऊ नका*

*कोवीड़ 19 च्या टेस्टींग ला घाबरू नका*

 

*जाणून पाँझेटिव्ह करत असल्यांच्या अफवांवर लक्ष देऊ नका*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया

सावनेरः कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्यातुनच नागरिकांची गैरसमज दुर करण्यासाठी महाराष्ट्र न्युज मीडिया तर्फे शहरातीलच नव्हे तर राज्यातील नागरिकांनी विशेषतः दुकानदार बांधवांनी निवेदन करण्यात येते की कोवीड़ 19 च्या रोकथाम अथवा रुग्णांची ओळख पटवून घेणाऱ्या एँन्टिजन व आरटीपीसीआर चाचण्या करवून घेण्याबाबत नागरिकांत संभ्रमाची स्थीती असुन जो टेस्टींग करेल तो पाँझेटिव्ह निघेल हि धारणा सपशेल चुकीची असल्याचे मत शासकीय प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़ विभागाचे डॉ. प्रितम निचट,डॉ संदीप गुजर तसेच तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ यांनी व्यक्त केले असुन सर्व नागरिकांनी सुरु असलेल्या कोरोना टेस्टींग चा लाभ घ्यावा असे निवेदन केले आहे*

* दि.20 फेब्रुवारी ला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्रात झालेल्या 379 नागरिकांच्या कोरोना टेस्टींग मधे फक्त 17 संशयित कोरोना बाधित आढळले असुन त्यांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे.*


*येत्या दोन तीन दिवसांत शहरातील भाजीपाला,फळ, दुध,पेपर विक्रेते,हाँटेल, रेस्टॉरंट व्यवसायी,कीराणा दुकानदार तसेच रिक्षा,आटोरिक्षा चालक आदिंच्या कोवीड़ 19 च्या टेस्टींग करुण घेण्याची प्रशासनानी पुर्ण तयारी असुन जे दुकानदार सदर टेस्टींग करणार नाहीत,ज्यांचे जवळ टेस्टींग रिपोर्ट तसेच त्यांचेकडे मास्क,दुकानात सेनिटायझर व सोशल डिस्टन्सींग आढळून येणार नाही अश्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीला प्रशासनाने कंबर कसली आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …