Breaking News

*छत्रपती शाहू शिक्षण संस्थेत शिवाजी महाराज जयंती साजरी*

*छत्रपती शाहू शिक्षण संस्थेत शिवाजी महाराज जयंती साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व दीप प्रज्वलित करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे स्थायी सदस्य प्राध्यापक वसंत हिवरकर उपस्थित होते .कार्यक्रमाला उद्बोधन करीत असताना संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ यांनी रयतेचा राजा शिवाजी महाराज यांनी जे शैक्षणिक, सामाजिक ,आर्थिक ,राजकीय अशा संपूर्ण क्षेत्रामध्ये जे कार्य केले त्या कर्तुत्वाची आज ही महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात ही ग्वाही दिल्या जाते तेव्हा आपण शिक्षकांनीही शिवाजी महाराजांसारखे शिवबा वर्गावर्गातून घडवावे असे प्रतिपादन केले.स्थायी समितीचे सदस्य प्राध्यापक वसंत हिवरकर यांनी शिवाजी महाराजांनीजी समतेची तत्त्वे आपल्या समोर ठेवलेली आहे ती तत्त्वे आपण स्त्री-पुरुष समानता असो किंवा जाती निर्मूलनाच्या बाबतीत असो तर प्रत्येक गोष्टीचा आपण सखोलपणे विचार करावा असे आव्हान केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लीला वाघ तर आभार प्राध्यापक अर्चना साऊरकर यांनी केले. कार्यक्रमाला संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होते .कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …