*जलस्वराज्यच्या निकृष्ट कामाचा फटका वारंवार फुटताहेत जलवाहिन्या*

*पोलिस बोलावुन अन्न सुरु केले काम*
*नांदा ग्रामपंचायतीचे वेळकाढूपणा*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना:- नांदा येथे जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत दहा कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजनेचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहेत कामाचे कंत्राट के के नायर कंपनी भंडारा यांना मिळाले असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने नांदाफाटा चौकातील जलवाहिनी एकाच ठिकाणी तीनदा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेताच मुख्य मार्गालगतच वारंवार खोदकाम होत असल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून धुळीमुळे स्थानिक नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे.
के के नायर या कंत्राटदार एजन्सीकडून नांदा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून कंत्राटदारला जलस्वराज्य अभियंता गोपाल काटके पाठीशी घालत असून निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नांदा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केला आहेत मागील वर्षभरापासून जलस्वराज्यच्या विविध समित्यांची कुठलीही बैठक घेण्यात आली नसल्याची माहिती आहेत नांदा येथील अनेक सिमेंट काँक्रीटचे रस्ते कंत्राटदाराने पाईपलाईनकरीता फोडले असून काही रस्त्याची दुरुस्ती अद्याप होतोय करुन दिलेली नाहीत तसेच काही ठिकाणची दुरूस्तीसुद्धा निकृष्ट दर्जाची केलेली आहेत तर अनेक ठिकाणी पाइपलाइन उघड्यावर पडली आहेत नांदा ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी कामाकडे दुर्लक्ष तर करीत असून कामाबाबत कसलेच नियोजन नसल्याने सिमेंट काँक्रीटचा नवीन रस्ता बनवण्यापूर्वी कंत्राटदाराला पाईपलाईन टाकायला लावणे गरजेचे असतांना तसे न करता आधी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला जातो नव्याने सिमेंट काँक्रीट रोड बनविल्यावर ते पाइपलाइन टाकण्याकरीता तोडले जातात असला भलताच प्रकार सुरु नांदा येथे सुरु आहेत तर अजुनही काही भागात पाणी पुरवठा होत नसल्याची व काही भागात पाईपलाईनच टाकली नसल्याची बाब समोर आली आहेत नांदा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात याचा फटका नागरिकांना बसणार असून पाणीपुरवठा याेजनेचे हस्तांतरण ग्रामपंचायतीला झाल्यावर मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत वारंवार जलवाहिन्या फुटत असल्याने दुरूस्तीचे काम ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत यांनी बंद पाडले हाेते व त्याठिकाणी जलस्वराज्यचे अभियंता व ठेकेदाराला बोलावण्याची मागणी केली होती परंतु नांदा ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकार्यांनी पोलीसांना फोन करुन बोलाविले पोलीसांच्या मध्यस्थीने दुरुस्तीचे काम सुरु झाले असले तरी जलस्वराज्यचे अभीयंते कामाची पाहणी जाग्यावर बसुन करीत ससल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत असुन बोगस कामाला ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकार्यांची चांगलीच साथ मिळाली आहे जलस्वराज्यच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे गडचांदूर वणी या राज्यमार्गा लगतच खोदकाम सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागानेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज