*कन्हान शहरात अति वेगाने वाढत असलेल्या कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता त्वरीत उपाय योजना करण्याची मागणी*

*सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रशासनाला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – रुषभ बावनकर
कन्हान – भारत देशात गेल्या एका वर्षापासुन कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे केंन्द्र शासनाने संपुर्ण देशात तीन ते चार महिने लाॅकडाऊन ठेवले असुन या लाॅकडाऊन चा कार्यकाळात मजदूर , गरीब व इतर नागरिकांचे सर्व काम धंदे बंद पडल्यामुळे त्यांचावर उपाशी राहण्याची वेळ आली असता त्यांनी आपले जीवन चटणी – रोटी खाऊन काही दिवस काढले असता कोरोना चा प्रादुर्भाव कमी होत गेल्यां ने शासनाने हळु – हळु लाॅकडाऊन हटवले त्यामुळे नागरिकांचे काम धंदे सुरु झाल्याने त्यांनी आपल्या घराची परिस्थीती सांभाळ्याला सुरुवात केली असता पुन्हा कोरोना ची लाट अति वेगाने जिल्ह्यात , तालुक्यात , व ग्रामीण परिसरात पसरत असल्यामुळे कन्हान शहरात कोरोना चा फैलाव थांबविण्याकरिता त्वरीत उपाय योजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांचा नेतृत्वात शैकडो नागरिकांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी , व आरोग्य विभाग प्रशासनाला एक निवेदन देऊन करण्यात आली आहे .

निवेदनात सांगितले कि नागपुर जिल्ह्यात गेल्या काही दिवसान पासुन कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे शाळेचे विद्यार्थी , शिक्षकगण तसेच नागरिक ह्या कोरोना संक्रमणाच्या विळाख्यात अडकुण औषध उपचार , तसेच शासन प्रशाशनाच्या निर्देशाचे पालन न केल्याने मृत पावलांनी आढळत आहे . कन्हान – पिपरी शहराच्या नगर वस्ती मध्ये नियमित किटक जन्य औषधांची फवारणी करण्यात यावी ह्या बाबतचे निवेदन विविध संघटन च्या वतीने नगर परिषद प्रशासनाला दिल्या वर ही नगर परिषद प्रशासनाने या विषयाकडे लक्ष केंन्द्रीत न केल्याने शहराती जिवघेणा धोकाधायक परिस्थिति निर्माण झाली असुन सदर विषयाचे गंभीर्याने दखल घेऊन कोरोना संक्रमणाच्या फैलावाला कन्हान शहरात कसे थांबविण्यात येईल याबाबत प्रशासकीय विविध प्रकारचे उपाय योजना त्वरीण करण्यात मावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांचा नेतृत्वात शैकडो नागरिकांनी कन्हान – पिपरी नगर परिषद च्या मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , कन्हान पोलीस स्टेशन चे निरीक्षक अरुण त्रिपाठी व आरोग्य विभाग प्रशासनाला एक निवेदन देऊन करण्यात आली आहे . या प्रसंगी प्रशांत वाघमारे , प्रशांत बाजीराव मसार , अमोल साकोरे , सुनिल पिल्ले , पकंज गजभिए , कुंदन रामगुंडे ,दिनेश नानवटकर , चंदन मेश्राम , शिवशंकर भोयर , राजेश गजभिए , विपीन गोंडाणे , राजेश क्षत्रिय , सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थीत होते.

Maharashtra News Media सच की आवाज