*कन्हान शहरात कोरोना चा फैलाव वाढला*
*नगर परिषद प्रशासनाने शहरात दंवडी फिरवुन नागरिकांना मास्क ,सेनिटाइजर नियमित वापरण्याचे व सोशल डिस्टेन्स चे पालन करण्याचे आव्हाहन केले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी शहरात पुन्हा एकदा कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी नागपुर यांचा आदेशानुसार कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासना द्वारे शहरात दवंडी फिरवुन नागरिकांना मास्क , सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्स चे पालन करण्याचे आव्हाहन केले आहे .
कन्हान – पिपरी शहरात गेल्या तीन चार दिवसापासुन कोरोना चा फैलाव अति वेगाने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी नागपुर यांचा आदेशानुसार कन्हान – पिपरी नगर परिषद प्रशासनाने बुधवार दिनांक २४ फरवरी २०२१ ला दुपारच्या सुमारास शहरात दंवडी फिरवुन सर्व शाळा , महाविद्यालय , प्रक्षिक्षण संस्था , व इतर तत्सम संस्था , सर्व कोचिंग क्लासेस दिनांक ०७ मार्च पर्यंत बंद करण्याचे आव्हान केले असुन दर शुक्रवार ला भरत असलेला शहराचा आठवडी बाजार जीवनावश्यक वस्तु वगळता बंद करण्यात आले असुन वैद्यकीय सेवा , वृत्तपत्र , दुध , भाजीपाला , फळांची दुकानें , पेट्रोल पंप व इतर अतिआवश्यक सेवा वगळून इतर बाजारपेठा व दुकाने दर शनिवार , रविवार ०७ मार्च पर्यंत बंद करण्याचे आव्हान करण्यात आले आहे . कन्हान शहरातील सर्व मंगल कार्यालय , सभागृह , लाॅन , रेसोर्ट , हाॅटेल सेलिब्रेशन लाॅन मध्ये होणारे समारंभाचे आयोजन दिनांक २५ फरवरी २०२१ पासुन तर ०७ मार्च २०२१ पर्यंत प्रतिबंध घालण्यात आले असुन शहरातील धार्मिक सभा , राजकीय सभा , सामाजिक व सांस्कृतिक , क्रीडा आयोजन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमा वर ०७ मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहे . तसेच रेस्टाॅरेंन्ट , खाद्यगृह , हाॅटेल , बार , हे एकुण क्षमतेच्या ५० % टक्के क्षमते मध्ये रात्री ०९:०० वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आव्हान केले असुन ०९:०० वाजता च्या नंतर बंद करण्याचे आव्हान केले आहे .
कन्हान – पिपरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी शहराच्या नागरिकांना शासनाच्या नियमाचे पालन , मास्क , सेनिटाइजर , व सोशल डिस्टेन्स चे पालन करण्याचे आव्हान केले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज