Breaking News

*महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतिने जनहितार्थ*

*महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतिने जनहितार्थ*

 

आपल्या सर्वनांन विनंती करण्यात येते की आपल्या आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत याचे जास्त टेन्शन घेऊ नका हे कधीना कधी होणारच होते, त्याची सुरुवात आहे असे समजा. सगळ्यात महत्वाचे जो कोणी कोरोना Positive होईल त्याच्या बद्दल,भीती,घृणा मनामध्ये ठेवू नका कारण ही वेळ कोणावरही येऊ शकते. पण सर्वात महत्वाचे या आजाराला जास्त घाबरू नका. अनेक तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे की रोगापेक्षा त्याच्या भीतीने जास्त लोक मरत आहेत, फक्त भीती आणि हार्टअॅटॅकने. कोणतीही नकारात्मक बातमी पसरू देऊ नका. एकमेकांना सतत फोनवर बोला, मन हलकं करा, कोरोनावर जास्त बोलू नका, बोलला तर फक्त चांगलं बोला. दुसऱ्याला आधार वाटेल असेच बोला. आज सगळे चिंतेत आहेत त्यामुळे खाली उतरायला पण घाबरतात. काळजी घ्यायचीच आहे,पण मानसिक त्रास होईल इतकी पण नाही. तणाव हा वेगळ्या आजारांना आमंत्रण आहे. तणावरहीत राहायचे असेल तर एकटे कोंडून घेऊन चालणार नाही. मोकळा श्वास घ्या, सर्व मित्रांशी कायम बोलत राहा. त्यातून मन हलकं करा ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वांशी कायम बोलत राहा, फक्त कोरोनाविषयी अजिबात बोलू नका, किंवा चांगले फक्त धीर देणारे बोला. बघा फरक वाटेल,मन शांत होईल,चांगली झोप लागेल,आणि तरच तब्बेत चांगली राहील. अजिबात घाबरू नका आणि दुसऱ्यांना घाबरवू नका ही विनंती.*

*घरिच रहा – सुरक्षित रहा .. सोशल डिस्टंन्स सोबतच फिजीकल डिस्टंन्स पाळा.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …