Breaking News

*कन्हान-पिपरी नगर परिषद चा वार्षिक अर्थसंकल्प २०२१-२२ विशेष सभा संपन्न*

*कन्हान-पिपरी नगर परिषद चा वार्षिक अर्थसंकल्प २०२१-२२ विशेष सभा संपन्न*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद मध्ये वार्षिक अर्थसंकल्प २०२१-२२ साठी विशेष सभा संपन्न झाली.
शुक्रवार दिनांक २६ ला कन्हान – पिपरी नगरपरिषद मध्ये नप नगराध्यक्षा सौ.करूणा आष्टणकर यांच्या अध्यक्षते खाली विशेष सभा घेण्यात आली . लेखापाल श्री पंकज खवसे यांनी नगर परिषद अंदाज पत्रकीय आर्थिक संकल्प सादर केले. यात घनकचरा, स्वच्छता या बाबीवर विशेष भर देण्यात आला आहे. सदर सभा मध्ये सर्व नगरसेवक , नगरसेविका , मुख्याधिकारी श्री गिरीश बन्नोरे , सभा अ़धिक्षक श्री सुशांत नरहरे, पाणी पुरवठा अभियंता श्री फिरोज बिसेन, नगर अभियंता श्री संतोष मुलकलवार, कर निरीक्षक रामकिसन सदगर सह आदी उपस्थित होते. सभा संपल्यावर नगराध्यक्षा सौ करूणा आष्टणकर यांनी सदर आर्थिक संकल्प हा कन्हान-पिपरी नागरिकांच्या अपेक्षा पुर्ण करणारा असल्याचे म्हटले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …