Breaking News

*कोरोना लेडी फायटर वैभवी शेंदरेनी आता पर्यत केले 3500 लोकांच्या कोरोना तपासणी*

*कोरोना लेडी फायटर वैभवी शेंदरेनी आता पर्यत केले 3500 लोकांच्या कोरोना तपासणी*

नरखेड़ प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड –आज कोरोना या अतिभयंकर आजाराने सर्व देशात व विदेशात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.पण या परिस्थितीत वर मात करणेचे व आपल्या जिव मुठीत धरून ज्या प्रमाणे देशाच्या सिमेवर एक सैनिक आपले देशाचे संरक्षण करतो .त्याच्या प्रमाणे कोरोना च्या सामन हा डॉक्टर व आरोग्य सेवक करत आहे. सर्व सामान्य माणूस हा कोरोना या आजार झाला तर भंयभीत होऊन चिंतेत येतो पण आरोग्य सेवकांना कोरोना शी दोन हात करून मुक्ताबला करावा लागतो .असाचा मुक्ताबला हा कोरोना महामारीच्या सुरू वातीच्या काळा पासून तर आज पर्यत प्राथमिक आरोग्य केंद्र मोवाड येथील सुपरवाईजर कु. वैभवी रमेश शेंदरे यांनी प्रा.आ.केंद्र मोवाड अंतर्गत येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागात राज्यातील,इतर राज्यातील,तसेच परदेशातील प्रवासी नागरिकांची कोरोना चाचणी व त्यांचे समुपदेशन केले,त्याचप्रमाणे मोवाड,खैरगाव,बेलोना, खरसोली,थुगाव निपाणी,खेडी या ग्रामीण भागातील गावांमध्ये जीवाची पर्वा न करता तेथील नागरिकांची कोरोना चाचणी केली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना औषधोपचार देणे,त्यांना कोविड सेंटर ला पाठविणे व त्यांचे योग्य समुपदेशन करणे इत्यादी कामे केली.त्यांनी आतापर्यंत जवळपास 3500 च्या वर कोरोना टेस्टिंग केल्यात या कार्यासाठी त्यांना डॉ संजय सोळंके, डॉ. प्रतीक राऊत,श्रीमती एन. रामटेके,प्रशांत विरखरे,दिपक सहारे, पी.वानखडे,मनोज बिले,योगेश क्षीरसागर व वाहनचालक किरण सेलोकर यांनी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …