*कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांची शोध मोहीम तूर्तास स्थगित करण्याची विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*

विशेष प्रतिनिधी वर्धा
वर्धा – सोमवार दि.1 मार्च 2021 ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व खाजगी प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा चे वतीने मा.जिल्हाधिकारी वर्धा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. वर्धा, मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ.) जि. प. वर्धा, मा. मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा यांना निवेदन देण्यात आले.

दि. 1 मार्च ते 10 मार्च या कालावधीत राज्यात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी शासनाने विशेष शोध मोहीम राबविलेली आहे. परंतु वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार बघता या मोहिमेत काम करतांना शिक्षक/ शिक्षिका मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत होऊ शकतात. त्यामुळे ही शोध मोहीम तूर्तास स्थगित करून कोरोनाचे सावट पूर्णपणे संपल्यानंतर राबविण्यात यावी या विषयीचे निवेदन देऊन ही शोध मोहीम तूर्तास थांबविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी चर्चेअंती सर्व अधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी सौ. प्रेरणा देशभ्रतार मॅडम यांचेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन विमाशीच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, कार्यकारी अध्यक्ष पांडुरंगजी भालशंकर, कार्यवाह महेंद्र सालंकार, खाजगी प्राथमीक शिक्षक संघाचे सचिव सुरेशकुमार बरे, विमाशीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल धवने, कोषाध्यक्ष शशांक हुलके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज