Breaking News

*बोरी (सिंगोरी) येथे दिनदहाड़े ६ तोळे सोन्याचे दागिने सह नगदी १ लाख रूपयांची चोरी* *फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील आरोपीचा शोध सुरु केला*

*बोरी (सिंगोरी) येथे दिनदहाड़े ६ तोळे सोन्याचे दागिने सह नगदी १ लाख रूपयांची चोरी*

*फिर्यादी यांचा तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील आरोपीचा शोध सुरु केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन च्या हदीत येणार्या बोरी (सिंगोरी) येथे दिनदहाड़े विनायक येरणे यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहुन अज्ञात चोरट्यांनी आलमारीत असलेले ६ तोळे सोन्याचे दागिने सह नगदी १ लाख रूपये असा एकुण अंदाजे चार लाखाची चोरी करून घटनास्थळा वरुन पसार झाले असता कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील आरोपीचा शोध सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार कन्हान पासुन पुर्वेस ८ किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरी (सिंगोरी) येथील विनायक येरणे यांचा मुलाचे यावर्षी लग्न करित असल्याने मुलगा सागर व सुनेकरिता दागदागिने बनवुन पैशाची जुळवाजुळव करित असतांना शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी ला भर दिवसा दुपारी २ ते ४. ३० वाजाता च्या सुमारास गावातील विनायक मागोजी येरणे वय ५५ वर्ष हे व घरची मंडळी गावातच कामा निमित्य गेले असल्याने त्याच्या घरी कुणीही नसल्या ची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी घराचा आत मध्ये प्रवेश करून घराच्या सामोरील हॉल मध्ये असलेल्या आलमारीत ठेवलेले १५ ग्रँम सोन्याचा गोफ, ६ ग्रँम अंगूठी, ३ ग्रँम टॉप, ३ ग्रँम वेल, ३ ग्रँम नथ, ३ ग्रँम अंगूठी, ५ ग्रँम गळसोळी, ३ तोळे चपलाकंठी, व नगदी ३२ हजार रूपए. तसेच मधल्या खोली मध्ये ठेवलेल्या लोखंडी आलमारीतुन ५ ग्रँम सोन्याची अंगूठी व नगदी ४० ते २० हजार रूपये असा अंदाजे चार लाख रूपयाचे नगदी व सोन्याच्या दागिन्याची चोरी करून अज्ञात चोर घटनास्थळावरुन पसार झाले. विनायक येरणे व परिवार ५ वाजता घरी आल्यावर आलमारील नगदी रूपये व सोन्याचे दागिने दिसुन न आल्याने फिर्यादी विनायक येरणे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी घटनास्थळा वर पोहचुन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांन विरूध्द कलम ३८० भादंवि नुसार गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख, पोलीस उपनिरीक्षक महादेव सुरजुसे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहेत .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …