Breaking News

*कन्हान नदीत कोळसा खदान चे दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावण्याची मागणी.* *कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण च्या पदाधिकार्यांनी गोंडेगाव उपक्षेत्र खुली कोळसा खदान उपक्षेत्र प्रबंधकांना दिले निवेदन.*

*कन्हान नदीत कोळसा खदान चे दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावण्याची मागणी.*

 

*कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाण च्या पदाधिकार्यांनी गोंडेगाव उपक्षेत्र खुली कोळसा खदान उपक्षेत्र प्रबंधकांना दिले निवेदन.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाणा चे संस्थापक अध्यक्ष व रामटेक लोकसभा माजी खासदार मा.प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात शहारातल्या शैकडो नागरिकांनी गोंडेगाव उपक्षेत्र प्रबंधक तरूणकुमार त्रिपाठी यांना निवेदन देऊन गोंडेगाव- घाटरोहणा खुली कोळसा खदानचे दुषित पाणी कन्हान नदीत सरळ बिनधास्त सोडण्या वर प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा जल जन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे .


वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत गोंडेगाव – घाटरोहना खुली कोळसा खदान मध्ये कोळसा उत्खनन करून दररोज २४ तास दुषित पाणी बाहेर फेकण्यात येते हे कोळसा व रासानिक स्पोटक मिश्रीत दुषित पाणी मोठ – मोठया पंम्पा च्या साह्याने खुल्या खाणीतुन ओढुन ६ नंबर रेती घाट, गाडेघाट, जुनिकामठी-घाटरोहणा घाटाच्या नाल्यातुन सरळ नदीत तसेच गोंडेगाव वसाहत, गोंडेगाव, घाटरोहना गावातील लोकवस्तीचे सांडपाणी सह दुषित पाणी कन्हान नदीत बिनधास्त पणे सोडत असल्याने कन्हान नदी मोठया प्रमाणात प्रदुषित होत आहे. याच नदीतुन नागपुर महानगर पालिका, कामठी शहर, जुनिकामठी, गाडेघाट, कन्हान -पिपरी, कांद्री व परिसरातील गावाच्या नागरिकांना ब्लीचींग टाकुन पिण्याकरिता नदीचे हेच पाणी पुरवठा करित असल्याने नागरिक विविध रोगाच्या आजाराने त्रस्त आहे. गोंडेगाव-घाटरोहना खुली खदानचे कन्हान नदी ६ नंबर घाट, गाडेघाट, जुनिकामठी-घाटरोहणा घाटा च्या नाल्याने सोडत असल्याने यावर प्रतिबंधात्मक एसटीपी लावुन हे पाणी शुध्द करूनच नदीत सोडण्यात यावे जेणे करून कन्हान नदीला प्रदुषित होण्यापासुन आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास होणा-या आजाराच्या धोक्यापासुन वाचविण्यात यश येईल.

नागपुर जिल्हयाची एकमेव जिवनदाहीनी कन्हान नदीचे अस्थित्वत कोळसा खाणीच्या दुषित पाण्याने व नागरी घाण, सांडपाण्याने प्रदुषित होऊन धोक्याची घटका मोजत आहे. कोळसा उत्खनन जसे राष्ट्राकरीता महत्वाचे आहे तसेच कन्हान नदी पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक प्रमुख स्त्रोत, साधन असल्याने नदी परिसरातील नागरीका़ंचे जिवन सुखकर व समृध्द करण्याकरिता ही नदी प्रदुर्षण मुक्त करणे काळाची गरज आहे. यास्तव वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत गोंडेगाव-घाट रोहना खुली कोळसा खदान व्दारे कन्हान नदी मुखा जवळुन १ किमी दुर अंतरावर दुषित पाण्याच्या नाल्या वर प्रतिबंधात्मक एसटीपी लावुन पाणी स्वच्छ करूनच नदीत पात्रात सोडण्यात यावे.अन्यथा जल जन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे . आंदोलनात उदभवणा-या सर्व परिस्थितीस आपण सर्वश्री जवाब दार राहाल.

” जल हेच जिवन आहे “ कन्हान नदीचे अंनंत उपकार आम्हावर आहेत. नदीत दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावुन नदी प्रदुर्षण मुक्त करा.अन्यथा अशुध्द पाण्या विरूध्द हे एक युध्दच ! अशा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे . याप्रसंगी कन्हान – पिपरी ग्रामोन्नती प्रतिष्ठाना चे संस्थापक अध्यक्ष व रामटेक लोकसभा माजी खासदार प्रकाश जाधव , मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, गोविंद जुनघरे , गणेश भोंगाडे, महेश काकडे, प्रमोद निमजे, भुषण इंगोले, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, सुतेश मारबते, नरेश बर्वे, सिन्नु विनेवार, धनंजय सिंह, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे, आकाश पंडीतकर, योगेंद्र रंगारी, सतिश भसारकर, मनिष भिवगडे सह मोठ्या संख्येत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …