Breaking News

*मराठी भाषा राजभाषा झाली पाहिजे-डाॅ.अशाेक भक्ते*

*मराठी भाषा राजभाषा झाली पाहिजे-डाॅ.अशाेक भक्ते*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- तायवाडे महाविद्यालय महादुला – काेराडी येथील मराठी विभागाच्या ज्ञान संवाद मंडळाच्या वतीने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे हाेत्या तर प्रमुख वक्ते नगरपरिषद शिवाजी महाविद्यालय माेवाड येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक भक्ते हाेते. त्यांनी मराठी ही राजभाषा झाली तर तिला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त हाेऊन सर्व स्तरावर तिचे महत्त्व वाढेल शिवाय तिची समृद्धी वाढविण्यासाठी मराठी माणसाने सर्व स्तरावर मराठीचा जागर केला पाहिजे हे सांगतानाच कुसुमाग्रजांच्या साहित्यिक याेगदानाची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ राजेंद्र वाटाणे यांनी केले तर सूत्र संचालन व आभार डॉ काेमल ठाकरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी माेठया संख्येने दूर दृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …