Breaking News

*लोखंडी लाॅन रोलर खाली दाबून मजुराचा मृत्यू* *कळमेश्वर तालुक्यातील घोराड येथील घटना*

*लोखंडी लाॅन रोलर खाली दाबून मजुराचा मृत्यू*

 

*कळमेश्वर तालुक्यातील घोराड येथील घटना*

विशेष प्रतिनिधि

कळमेश्वर – जवळील घोराड शिवारात दिनांक २ मार्च ला सकाळी ११:३० वाजता दरम्यान बैलजोडीने चालणाऱ्या लोखंडी रोलर ने लाॅन (गवताची) सपाटीकरण करत असताना बैल दचकल्याने मजुराचा तोल जाऊन लोखंडी रोलर खाली येऊन गंभीर जखमी होऊन मृत्यूक हा जागीच मरण पावल्याची घटना घडली.

 

*प्राप्त माहितीनुसार ज्ञानेश्वर माधवराव कडू वय ५४ वर्ष रा घोराड हे मृतक मजुराचे नाव असून कवडू सोमा चांभारे रा घोराड यांच्या घोराड शिवारातील लाॅन गवत निर्माण करणारी शेती असून लाॅन गवताचे सपाटीकरण करण्यासाठी मृतक हा तीनशे रुपये रोजीने मजुरीचे काम करीत होता*

*दिनांक २ मार्च ला सकाळी ११:३० वाजता दरम्यान ज्ञानेश्वर कडू हा बैलजोडीने चालणाऱ्या लोखंडी लाॅन रोलर ने लाॅन गवताचे सपाटीकरण करीत असतांना कसल्यातरी आवाजाने बैल दचकले व त्यामुळे मूत्यकाचा तोल जाऊन खाली पडला व लोखंडी रोड रोलर त्यांच्या अंगावरून गेल्यामुळे ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्याची घटना घडली कळमेश्वर पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करता ग्रामीण रुग्णालय आणले पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास ठाणेदार असिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेश वानखेडे व सचिन खरबडे करीत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …