*कन्हान-पिपरी नगर परिषद चे उपाध्यक्ष पद्दी शिवसेनेचे डँनियल शेंडे यांची निवड*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष कॉंग्रेस कडुन अपक्ष विनय यादव यांना ६ मते तर शिवसेनेचे डँनियल शेंडे हयाना १२ मते मिळाल्याने कन्हान-पिपरी नगर परिषद च्या उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचे डँनियल शेंडे यांची निवड करण्यात आली.
सोमवार दिनांक १ मार्च २०२१ ला कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा करूणा आष्टणकर , पिठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली, नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे , व सभा अधिक्षक सुशांत नरहरी यांच्या प्रमुख उपस्थित उपाध्यक्ष पदाकरिता निवडणुक कन्हान – पिपरी नगर परिषद च्या
सभागृहात घेण्यात आली. कन्हान नगर परिषद मध्ये शिवसेना पक्षाचे करूणाताई आष्टणकर यांनी जनतेनी निवडुन दिल्याने त्या नगराध्यक्षा पदावर आहेत. शिवसेना ३ नगरसेवक, कॉंग्रेस ७ नगरसेवक, भाजपा ६ नगरसेवक व प्रहार चे अपक्ष १ नगरसेवक असे १७ नगरसेवक जनतेने निवडुन दिले आहेत. पहिल्यांदा महाआघाडीची सत्ता स्थापन करून कॉंग्रेस चे योगेंद्र रंगारी यांना उपाध्यक्ष निवडण्यात आले होते परंतु एका वर्षातच योगेंद्र रंगारी यांचे वर अविश्वास प्रस्ताव पारित केल्याने सोमवार दिनांक १ मार्च २०२१ला उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकी मध्ये कॉंग्रेस गटा कडुन अपक्ष विनय यादव यांचा तर शिवसेना,भाजप व्दारे डँनियल शेंडे यांचे नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला होता. कॉंग्रेस गटाचे विनय यादव यांना ६ मते तर शिवसेनेचे डँनियल शेंडे यांना १२ मते मिळाल्याने डँनियल शेंडे यांची कन्हान-पिपरी नगर परिषद च्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. राज्यात महाआघाडी शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने कन्हान – पिपरी नगर परिषद मध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षा करूणा आष्टणकर आणि शिवसेनेचे उपाध्यक्ष डँनियल शेंडे पदारूढ झाल्याने शहरवासी शहराचा जलद गती ने विकासात्मक कामे होण्याची अपेक्षा व्यकत करित आहे .
Maharashtra News Media सच की आवाज