*भाजपचे शंकरराव चंहादे ६ वर्षाकरिता निलंबित तर दोघांना कारण दाखवा नोटीस*
*पक्षाच्या अधिकृत भुमिकेशी विसंगत वर्तणुकी ने शंकर चंहादे निलंबित, तर अतुल हजारे, व राजेंन्द्र शेंदरे यांना नोटीस.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला समर्थन दिल्यामुळे भाजपा पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले असुन माजी नगराध्यक्षा व वर्तमान मनोनित सदस्य श्री शंकर चहांदे यांना भाजप ने पक्षातुन सहा वर्षासाठी निलंबित केले आहे. तर भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे व गटनेता राजेंद्र शेंदरे यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे .
कन्हान – पिपरी नगर परिषद चे उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर ०१ मार्च २०२१ ला कन्हान – पिपरी नगर परिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. शिवसेना ३ नगरसेवक, १ नगराध्यक्षा असे ४, भाजप ६ नगरसेवक, असंतुष्ट कॉंग्रेस २ नगरसेवका च्या समर्थना ने शिवसेनेचे डॅनियल शेंडे १२ मताने निवडुन आले. भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश महामंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतुन कन्हान नगरपरिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षाची भुमिका निश्चित करण्यात आली होती. या बाबतची अधिकृत सुचना वारंवार संबंधित पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती परंतु पक्षादेश झुगारून पक्षाच्या अधिकृत भुमिकेशी विसंगत वर्तणुक केली आहे. अशा प्रकारचा ठपका ठेवुन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गजभिये यांनी एका आदेशान्वये श्री शंकर चहांदे यांना पक्षातुन ६ वर्षाकरिता निलंबित केले आहे. तर नगरपरिषद येथे भाजप चे गटनेता म्हणुन श्री राजेंद्र शेंदरे व भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष श्री अतुल हजारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावुन सात दिवसांमध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे .

शंकर चहांदे हे १९९२ पासुन भाजप मध्ये कार्यरत आहे. या भागात पक्ष विस्ताराचे काम मोठ्या जोमाने केले आहे. नागपुर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती व कन्हान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद ही भुषविले आहे. पक्षातुन निलंबित केल्यानंतर श्री शंकर चहांदे पुढे कोणती भुमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज