Breaking News

*नागपुर ग्रामीण क्राईम डायरी*

*नागपुर ग्रामीण क्राईम डायरी*

*जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक*


पो.स्टे अरोली -अंतर्गत 10 मी अंतरावर निमखेडा शिवार येथे दिनाक 01/03/2021 चे 21.30 वा . दरम्यान फिर्यादी नामे- खेमराज दयाराम किरणापुरे , वय 47 वर्ष , रा . मिखेडा हे शौचास गेले असता आरोपी नामे- 1 ) येशुप्रसाद दत्तात्रय पांढरे , वय 26 वर्ष , रा . रेवराल व 2 ) विनोद केशवराव येवतकर , वय 26 वर्ष , रा . वकीलपेठ हनुमान नगर , इमामवाडा , नागपूर यांनी संगनमत करून फिर्यादीस पकडून त्यांना हातबुक्कीने मारहाण करून जखमी केले . तसेच आरोपीतांनी फिर्यादीच्या ताब्यातील एमएच -40 / यु -2327 क्रमांकाची मोटरसायकल कि . 20,000 / -रू . तसेच त्याचे खिश्यातील आयटेल कंपनीचा मोबाईल कि , 1,500 / -रू . चा असा एकुण कि . 21,500 / -रू . चा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावुन नेले . आरोपीतांचा शोध घेत असता दि . 02/03/2021 चे 13.00 वा . सुमारास लोकांनी सदर दोन्ही आरोपीतांना पकडून ठेवले होते . सदर प्रकरणी फियादी यांचे रिपोर्ट वरुन पो.स्टे . अरोली येथे आरोपीतांविरुध्द कलम 394 , 34 भादंवि , अन्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीतांना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री अशोक कोळी 9657811111 हे करीत आहे .

 

*दुखापत*

पो.स्टे . पारशिवनी : – अंतर्गत 7 कि . मी . अंतरावर मौजा इटगाव येथे दिनांक 02/03/2021 चे 19:00 वा . दरम्यान फिर्यादी नामे- मिलिंद राजु काळे , वय 22 वर्ष , रा . इटगाव हा गावातील त्याचे मित्र नामे- सचिन गौरखेडे , निखील बेलेकर , अर्जुन बेलेकर व इतरांसोबत हनुमान मंदीराजवळ किकेट खेळत होता . त्यादरम्यान आरोपी नामे- मनिष येवले , रा . इटगरव हा तिथे आला व फिर्यादी व इतरांना अडथळा निर्माण करीत होता . त्यामुळे फिर्यादीने म्हटले की , ” आम्हाला किकेट खेळु दे , तु मधोमध येवु नको . ” याकारणावरून आरोपीने फिर्यादीस धक्का देवून गिट्टीवर पाडले व हातातील काळीने फिर्यादीस मारले . सदर प्रकरणी फिर्यादी याचे रिपोर्ट वरून पो.स्टे . पारशिवनी येथे आरोपीविरुध्द कलम 325 , 323 भादवि , अन्वये गुन्हा नोंद केला आहे . यातील आरोपीचा शोध घेणे सुरू आहे . गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रभाकर झोड 8200949874 हे करीत आहे .

 

*अपघातात मृत्यु*

पो.स्टे . खापरखेडा : – अंतर्गत नॅशनल ब्रिक्ससमोर बिनासंगम रोड येथे दिनांक 02/03/2021 चे 06:00 वा . ते 06 , 15 वा . दरम्यान फिर्यादी नामे- सौ . अश्विनी कैलास बेहलपाडे , वय 40 वर्ष , रा . वार्ड क्र . 1 , बिनासंगम व त्यांचे गावातील तीन महिला पायदळ बिनासंगम गावाकडुन शातीपार्क बिनाकडे रोडने पायदळ मॉर्निंग वॉक करीता जात होत्या . त्यादरम्यान आरोपी क . 1. टिप्पर के . एमएच- 40 / ए -7568 चा चालक नामे- रोहीत सुरेश झोराडे , रा . छिंदवाडा मध्यप्रदेश , ह . मु . खापरखेडा व आरोपी क . 2. बुलेरो पीकअप क . एमएच- 31 / उफसी -4993 चा चालक नामे- राजु यशवंत भरे , वय 25 वर्ष रा . यार्ड क . 1 विनासंगम या दोघांनी आपआपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन ओवरटेक करण्याचा प्रयत्नात दोन्ही वाहनात अपघात झाला . या अपघातात बुलेरो पीकअप गाडीनी पलटी घेतल्याने त्यामध्ये पायदळ चालनारे फिर्यादीसह इतर 3 महिला जखमी झाल्या . त्यापैकी गोदावरी नामदेव भुरे , वय 41 वर्ष , रा . वार्ड के 1 बिना संगम यांना उपचारा करीता आशा हाँस्पीटल कामठी येथे नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला , सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . खापरखेडा येथे आरोपी चालकाविरुध्द कलम 279 , 337 , 338 , 304 ( अ ) भादवी . सहकलम 184 मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपी क . 2 यास अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक मलकुवार 9822764999 या करीत आहे .*

 

*रस्ते अपधात*

 

पो.स्टे . रामटेक : – अंतर्गत 14 कि . मी . अंतरावर मौजा भंडारबोडी रामटेक येथे दिनांक 02/03/2021 चे 16.30 वा . ते 17.00 वा . दरम्यान फिर्यादी नामे- राजकुमार शालीकराम मेश्राम , वय 40 वर्ष , रा . नंदापुरी हे त्यांच्या एमएच 40 / पी -4683 क्रमांकाच्या बजाज प्लॅटीना मोटरसायकलने डबलसिट मागे बसुन तुमसर वरून रामटेकला येत होते . त्यादरम्यान अज्ञात ट्रक चालक आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादींच्या मोटरसायकल कट मारली . या अपघातात मोटरसायकल चालक नामे- समालुराम उर्फ गोलु छेदीराम सोनवने , वय 36 वर्ष , रा . नंदापुरी हा जाग्यावर मरण पावला . तर फिर्यादी हे किरकोळ जखमी होवुन बेशुद्ध झाले व आरोपी हा आपले वाहन घेवुन पसार झाला . सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे . रामटेक येथे आरोपी चालकाविरुध्द कलम 279 , 337 , 304 ( अ ) भादंवी . सहकलम 184 मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद राउत 9881883184 हे करीत आहे

 

*अकस्मात मृत्यू*


पो.स्टे . कळमेश्वर : – अंतर्गत 4 कि . मी . अंतरावर मौजा घोराड शिवार येथे दिनांक 02/03/2021 चे 11.30 वा . दरम्यान गावातील कवडु चांभारे यांच्या शेतातील लॉन वर रोलर फिरत असतांना ज्ञानेश्वर माधोवराव कडु , वय 58 वर्ष , रा . घोराड हे अचानक रोलर खाली आल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यु झाला . सदर प्रकरणी फिर्यादी नामे- सुनिल ज्ञानेश्वर कडु , वय 30 वर्ष , रा . घोराड ता . कळमेश्वर यांचे रिपोर्टवरुन पो . स्टे . कळमेश्वर येथे कलम 174 जाफौ . कायद्यान्वये मर्ग नोंद केलेला असून पुढील तपास सहायक फौजदार राजेश वानखेडे 9850492065 हे करीत आहे .

 

*जबरी संभोग*


पो.स्टे . काटोल फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी / पीडिता वय 15 वर्ष हिला आरोपी नामे- रामलाल शालीकराम भलावी , वय 30 वर्ष , रा . जामरापाणी पो.स्ट देवली ता . सौंसर मध्यप्रदेश याने दिनांक 17/02/2021 चे 20:30 वा . ते 21.00 वा . चे सुमारास फुस लावुन पळवुन नेले . यानंतर आरोपीने पीडित मुलगी हिला एका शेतात नेवुन तिच्या सोबत लैंगीक अत्यावार केले . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . काटोल येथे आरोपीविरुध्द कलम 363 , 376 , ( 2 ) ( जे ) ( एन ) ( 3 ) भादंवि . सहकलम 4 , 5 ( एल ) 6 बाल लैगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश शाही मो.न. 9881281071 हे करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …