Breaking News

*पोलीस निरिक्षकांचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान*

*पोलीस निरिक्षकांचे नागरिकांना सतर्कतेचे आव्हान*

विशेष प्रतिनिधि
नागपुर –  रमणा मारोती मंदिर, कामगार नगर येथील राधाकृष्ण उद्यानात , नंदनवन पोलीस स्टेशन नागपूर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा . मुख्तार दाउत शेख यांचे परिसरातील महिलांना विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला . वाढत्या गुन्हेगारी , घर फोडी , दागिने लंपास करणे यावर महिलांनी काय खबरदारी बाळगायला पाहिजे या विषयी सविस्तर माहिती दिली . महिलांनी सुध्दा चांगला प्रतिसाद दिला व काही त्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या , आपल्या काही भागात गस्त वाढविणे गरजेचे आहे अशी सूचना करण्यात आली .

नयना संजय झाडे , माजी नगरसेविका यांनी आपल्या परिसरात ठिकठिकाणी अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित आपण करणार आहेत असे आवर्जुन सांगितले व महिलांनी त्यासाठी सहकार्य करून सहभागी व्हावे व सतर्क राहावे अशी विनंती करण्यात आली . श्री हरमेश परमाल , हेड कॉन्स्टेबल यांनी विशेष सहयोग दिले तर , ठोंबरे सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तर इंगोले ताई , शुद्धलवार ताई , तिजारे ताई , चौधरी ताई यांनी स्वागत केले , अललेवर ताई , संगीडवार ताई , नाटकर ताई , लांजेवार ताई , वठमोडे ताई पांडव ताई, रेखाताई गाडवे , शुभांगी मानापुरे ज्योती भेंडेकर , सोनू धांडे , पन्नासे ताई , नंदनवार ताई व परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …