व्यक्तीच्या गरजेतून राज्याची निर्मिती :डॉ.मंगेश आचार्य

प्रतिनिधि – दिलीप येवले(कोराडी)
कोराडी-ईश्वराने राज्याच्या निर्मितीपुर्वी या भुतलावर एका मनुष्याची निर्मिती केली व त्याच्या मदतीसाठी एका स्त्रीची निर्मिती केली.यांचे एक कुटूंब बनले.त्यांच्यापासून अनेक कुटूंबाची,पूढे कूळाची व नतंर समाजाची निर्मिती झाली.पूढे या समाजाच्या स्वायत्तता व सुरक्षेसाठी मनुष्याने राज्याची निर्मिती केली.राज्याच्या निर्मितीचे अनेक सिध्दांत आहे त्या सर्व सिध्दांताचा उहापोह उदाहरणासह डॉ.मंगेश आचार्य यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
स्थानिय तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने “राज्य,उत्पत्ती व विकास “या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमसाठी प्रमुख वक्ते म्हणुन जिवन विकास महाविद्यालय थुगावदेव, ता. नरखेड जि.नागपूर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.मंगेश आचार्य हे होते,यांनी “राज्य,उत्पत्ती व विकास”या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे या होत्या,यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणातून राज्याच्या वेगवेगळ्या अवस्था सांगून त्यातून झालेल्या विकासावर भर दिला.ज्या प्रमाणे व्यक्तीच्या जन्मापासून मरेपर्यंत ज्या अवस्था असतात तशाच अवस्था राज्याच्या सुध्दा आहेत,राणटी अवस्थेपासून तर आज विज्ञानयुगाच्या अवस्थेपर्यंत त्यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.वकील शेख यांनी केले तर सूत्रसंचालन कू.समीना शेख हिने व आभारप्रदर्शन सौरभ जामगडे याने मानले.या कार्यक्रमाला डॉ.कीशोर घोरमाडे,डॉ.कोमल ठाकरे श्री.शरद ईझाटे व इतर प्राध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज