Breaking News

*जूनी पेन्शन योजनेसह शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडवा* *विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*

*जूनी पेन्शन योजनेसह शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडवा*

*विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*

विशेष प्रतिनिधी वर्धा

वर्धा – शुक्रवार दि. 5 मार्च 2021 रोजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा वर्धा चे वतीने जिल्हाध्यक्ष मा. श्री राजू चंदनखेडे यांचे मार्गदर्शनात व जिल्हा सचिव मा. श्री महेंद्र सालंकार यांचे नेतृत्वात मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. वर्धा व मा. अधीक्षक समाजकल्याण कार्यालय वर्धा यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षण मंत्री म. राज्य यांना राज्यातील खाजगी, स्थानीक स्वराज्य संस्था द्वारा संचालित प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक व आदिवासी आश्रम शाळा मधील सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या निवारणार्थ निवेदन देण्यात आले. त्यात DCPS/ NPS योजना रद्द करून सर्वांना जूनी पेन्शन योजना लागू करा, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना प्रचलीत धोरणानुसार तात्काळ अनुदान मंजूर करा, वरिष्ठव निवड श्रेणी प्रशिक्षणाशिवाय सरसकट सर्वांना लागू करा , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 10-20-30 वर्षाची आश्वासीत प्रगती योजना लागू करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधाचा दि. 11 डिसेंबर 2020 चा शासन निर्णय रद्द करावा, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबीत पहिला व दुसरा हफ्ता देण्यात यावा, राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 1 तारखेला अदा करावे व नियमीत वेतन विलंबाने होण्यास जवाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत, अनुकंपा नेमणूक तात्काळ देण्यात यावी . या मागण्यांसह इतर सर्व प्रलंबित मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला होता.यावेळी निवेदन देतांना विमाशी संघाचे सचिव महेंद्र सालंकार, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेशकुमार बरे, विमाशीचे उपाध्यक्ष सुनिल धवने, कोषाध्यक्ष शशांक हुलके, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रमोद खोडे, संजय बावनकर, श्री सचिन रिठे , श्री भिमराव खुडे आदी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …