Breaking News

*आठवडी बाजारात विनामास्क गर्दी मात्र रविवारी कोरोना सुट्टीवर*

*आठवडी बाजारात विनामास्क गर्दी मात्र रविवारी कोरोना सुट्टीवर*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली असताना वरोरा शहरातील नवीन तहसीलदार यांनी रुजू होताच कडक कारवाई ला सुरुवात केली .वरोरा शहरातील विविध भागांतील दुकानांमध्ये जाऊन त्यांनी दुकानदारांवर दंड ठोठावला .
त्यामुळे नवीन तहसीलदार साहेब खूपच कडक असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली .


वरोरा शहराचा आठवडी बाजार हा रविवारी असतो त्यामुळे वरोरा शहरालगत असलेल्या सर्व खेडेगावातील नागरिक भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात येतात ,परंतु आज आठवडी बाजारात बरेच नागरिक विना मास्क खरेदी ,विक्री करताना दिसले त्यामुळे कोरोना ला रविवारी सुट्टी असते की काय हा प्रश्न शहरातील सुजाण,जागरूक नागरिकांना पडला आहे .या मास्क नसलेल्या नागरिकांवर कारवाई होण्याची अपेक्षा असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही हे विशेष. मागील काही दिवसापासून वरोरा शहरात 60 ,55,40 अश्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळत आहे त्यामुळे फक्त दुकानदारावरच कारवाई न करता आठवडी बाजारात देखील कारवाई व्हावी अशी इच्छा काही नागरिकांनी बोलून दाखवली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …