*जेष्ठ नागरिकांना कोरोना वैक्सीन कन्हान व साटक ला देण्यास सुरूवात*
*कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या वतीने दोन दिवसात २०० नागरिकांना वैक्सीन लावल्या , तर साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या वतीने दोन दिवसात ७३ नागरिकांना वैक्सीन लावल्या*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान / साटक : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या वतीने नवीन नगरपरिषद इमारत येथे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यक्तींना कोरोना वैक्सीन लावण्याचा शुभारंभ करून पहिल्या दिवसी दिनांक ५ मार्च ला ८३ व दिनांक ६ मार्च ला ११७ अश्या एकुण २०० नागरिकांना कोरोना वैक्सीन लावण्यात आले असुन कोरोना प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोर पणे पालन करण्याचे आवाहन डॉ योगेंद्र चौधरी यांनी केले आहे.
आपल्या राज्यात मार्च २०२० पासुन कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव अतिवेगाने फैलल्याने सर्वसामान्यांना भयंकर हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या आहे. शासनाने दिनांक ५ मार्च पासुन ६० वर्ष व त्या वरील जेष्ठ नागरिक व ४ वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता कोरोना वैक्सीन देण्याचा नविन नगरपरिषद इमारत येथे शुक्रवार दिनांक ५ मार्च ला शुभारंभ करण्यात आले असुन पहिल्याच दिवशी ८३ नागरिकांना कोरोना वैक्सीन लावण्यात आली. ही कामगिरी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेंद्र चौधरी, डॉ अन्सारी राऊत, शारी मेश्राम, माहुरिया, सुरेंद्र गि-हे, राऊत, कोल्हे, सीएचओ, सिस्टर आदी परिश्रम घेत आहेत. नागपुर जिल्ह्यात दिवसेन दिवस कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन कोरोना लस जरी देणे सुरू झाली तरी नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे पालन करित मॉस्क लावणे, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कामानिमित्यच घरा बाहेर निघणे, लक्षणे जाणवल्यास कोरोना तपासणी करून घेणे. आदीचे काटेकोरपणे पालन केल्यास या विषाणुजन्य आजारावर विजय मिळवता ृयेईल असे आवाहन डॉ योगेंद्र चौधरी हयानी केले आहे .
तर दुसरी कडे प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या वतीने ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यक्तींना कोरोना वैक्सीन लावण्याचा शुभारंभ साटक ग्रामपंचायत सरपंचा सिमा उकुंडे यांच्या प्रमुख उपस्थित करून पहिल्याच दिवसी दिनांक ५ ला २३ व दिनांक ६ मार्च ला ५० अश्या एकुण ७३ नागरिकांना कोरोना वैक्सीन लावण्यात आले असुन कोरोना प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन डॉ प्रज्ञा आगरे यांनी केले आहे.

आपल्या राज्यात मार्च २०२० पासुन कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव अतिवेगाने फैलल्याने सर्वसामान्यांना भयंकर हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या आहे. शासनाने दिनांक ५ मार्च पासुन ६० वर्ष व त्या वरील जेष्ठ नागरिक व ४० वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता कोरोना वैक्सीन देण्याचा नविन नगरपरिषद इमारत येथे शुक्रवार दिनांक.५ ला प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे सरपंचा सिमा उकुंडे यांच्या प्रमुख उपस्थित शुभारंभ करण्यात आले असुन पहिल्याच दिवसी २३ व दुस-या दिवसी दिनांक६ मार्च ला ५० नागरिकांना कोरोना वैक्सीन लावण्यात आली. ही कामगीरी प्राथमिक आरोग्य केंद्र साटक प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा आगरे, डॉ तिवारी, आपोग्य परिवक्षक अशोक सोनटक्के, नंदकिशोर डोईफोडे, दामोधर ठोंबरे, उषा चव्हाण, प्रेरणा घोटेकर, कल्पना निमकर, सचिन मानकर, मंगेश खोडे, उईके आदी परिश्रम घेत आहेत. नागपुर जिल्ह्यात दिवसेनदिवस कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन डॉ प्रज्ञा आगरे यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज